UBT Washim Vidhan Sabha Candidate Siddharth Ddevale : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये तीन दिवसांपूर्वी पक्षप्रवेश केलेल्या उमेदवाराला तिकीट देण्यात आलं आहे.
आज उबाठा गटाच्या पहिल्याच यादीत त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.
वाशिम शहरातील हृदयरोग तज्ञ असलेल्या डॉ. देवळे यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढवली होती. त्यांना दुसऱ्या क्रमांकाची ५२४६४ मतं मिळाली होती. आता त्यांना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून वाशिम जिल्ह्यातील त्यांची उमेदवारी घोषित होणारे ते पाहिले उमेदवार आहेत. यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर शिवसेनेत बंडाळी होण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून डॉ. सिद्धार्थ देवळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. मात्र महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहण महत्वाचं आहे.
सध्या या मतदारसंघात भाजपचे लखन मलिक हे सलग तीन वेळा निवडून आले आहेत. मात्र भाजपाच्या पहिल्या यादीत त्यांचं नाव आलं नाही, त्यामुळे त्यांच्या जागेवर दुसरा उमेदवार दिला जाणार असल्याची चर्चा मतदार संघात आहे. मात्र भाजपकडून इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने इथे बंडाळी टाळण्यासाठी युतीकडून शेवटच्या टप्प्यात उमेदवार घोषित केला जाऊ शकतो. वंचित बहुजन आघाडीकडून इथे मेघा डोंगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Washim News : तीन दिवसांपूर्वी पक्षप्रवेश केलेल्या उमेदवाराला ठाकरेंकडून तिकीट, कोण आहे डॉ. सिद्धार्थ देवळे?
शिवसेनेकडून निलेश पेंढारकर, राजा भय्या पवार, राजू मानमोठे, यांच्यासह इतर शिवसैनिक इच्छुक होते. २०१९ मध्ये निलेश पेंढारकर यांनी अपक्ष निवडणूक लढवत ४५४०७ मतं मिळवली होती. मात्र यातील एकाही शिवसैनिकाला उमेदवारी न दिल्याने बंडाळी होण्याची दाट शक्यता आहे. आता उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय आदेश करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.