जावयाचे पाय धुत बसणार नाही… सुप्रिया सुळेंकडून परिवर्तनाची नांदी, म्हणतात सासू को गिफ्ट दो…

Supriya Sule on Son in law : मी शोधतेय.. अजून मिळाला नाही जावई… नाहीतर माझा जेव्हा येईल ना.. चौथ्या वर्षी मी आणि सदानंद सोफ्यावर बसू, असं सुप्रिया सुळे म्हणत होत्या

हायलाइट्स:

  • बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले की, या मतदारसंघातील कुठलीही माई आजनंतर जावयाचे पाय धुत बसणार नाही.
  • सुप्रिया सुळे यांनी सामाजिक परिवर्तनासाठी जावयाने सासू आणि आईचे पाय धुवावे, अशी मागणी आधीही केली होती.
  • सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जावई बाहेरचा नाही तर तो आपला मुलगाच आहे आणि सून प्रेमाची आहे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे : या मतदारसंघातील कुठलीही माई आजनंतर जावयाचे पाय धुत बसणार नाही, असा पुनरुच्चार बारामतीच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला. याआधी जून महिन्यात धोंडे जेवणाच्या वेळीही सुप्रियांनी जावयानेच सासू आणि आईचे पाय धुवावेत, असं म्हणत सामाजिक बदलाचं आव्हान केलं होतं. मीही जावई शोधतेय, अजून मिळाला नाही, असं सुप्रिया म्हणाल्या.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

या मतदारसंघातील कुठलीही माई आजनंतर जावयाचे पाय धुत बसणार नाही. आता माझाच… मी शोधतेय.. अजून मिळाला नाही जावई… नाहीतर माझा जेव्हा येईल ना.. चौथ्या वर्षी मी आणि सदानंद सोफ्यावर बसू.. बेटा करो अभी.. सासू को गिफ्ट दो… आपली पोरगी कमवतेय.. आपला जावई कमवतोय… तर आपला पण मुलगा आहे ना… जावई काय बाहेरचा नाही.. तो आपला मुलगाच आहे… सून प्रेमाची.. लेक.. सगळे वन फॅमिली आहेत.. असं सुप्रिया सुळे सांगत होत्या.
Amit Thackeray : आदित्य सत्तेत असताना निवडणूक लढला, चांगला निर्णय होता पण… अमित ठाकरेंचं पहिल्यांदाच नाव घेत भाष्य
कशासाठी कोणाचे पाय धुवायचे… हे सामाजिक परिवर्तन फक्त कपड्यातून येत नाही. ते सामाजिक परिवर्तन आपल्या आयुष्यात आणि निर्णय प्रक्रियेत झालं पाहिजे.. त्याला क्रांती म्हणतात.. हा बदल आपल्याला महाराष्ट्रात घडवायचा आहे, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं.
Zeeshan Siddique : ठाकरे मलाच मत देतील म्हणणारे झिशान सिद्दीकी चिडले; साथ देणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं!

धोंडे जेवणाला सुप्रिया सुळेंनी काय किस्सा सांगितला होता?

मला धोंडं जेवण काय असतं, हे माहितच नव्हतं, मला धोंडं जेवण कुणामुळे कळलं तर रीलमुळे. कोणीतरी मला सांगितलं, दर तीन वर्षांनी जावयाला बोलवायचं आणि त्याचे पाय धुवायचे. मी म्हटलं कशासाठी, तर म्हणाले अशीच पद्धत असते. मग मी म्हटलं, माझ्या लोकसभा मतदारसंघात मी बदल करणार. जरुर धोंडी जेवण करा, माझा त्याला विरोध नाही. पण असं करुया आपण, सासूने त्याचे पाय धुवायच्या ऐवजी जावयाने सासू आणि आईचे पाय धुवायला पाहिजेत. की एवढी सोन्यासारखी मुलगी आम्हाला दिलीत, असा बदल सुप्रिया सुळे यांनी आधीही सुचवला होता.

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Revati SuleSupriya Sule DaughterSupriya Sule on Son in lawसामाजिक परिवर्तनसुप्रिया सुळेसुप्रिया सुळे जावई पाय धुणेसुप्रिया सुळे धोंडे जेवण किस्सासुप्रिया सुळे बारामती भाषण
Comments (0)
Add Comment