मोठी बातमी! पुण्यात पाण्याची टाकी कोसळली, पाच कामगार अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु

Pune Water Tank Collapse: पिंपरी-चिंचवड येथे पाण्याची टाकी कोसळून भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ५ कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

हायलाइट्स:

  • पुण्यात पाण्याची टाकी कोसळून भीषण दुर्घटना
  • पिंपरी-चिंचवड येथील भोसरीतील घटना
  • पाच कामगार अडकल्याची भीती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे: पिंपरी-चिंचवड येधील भोसरी परिसरात एक मोठी दुर्घटना घडली आली आहे. येथे आज सकाळच्या सुमारास पाण्याची टाकी कोसळ्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत पाण्याची टाकी कोसळून पाच कामगार त्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भोसारी परिसरातील सदगरू नगर परिसरत ही घटना घडल्याची माहिती आहे. लेबर कॅम्पमध्ये राहणाऱ्या कामगारांवर ही पाण्याची टाकी कोसळून भीषण दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली असून कामगारांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. यावेळी स्थानिकांनी घटनास्थळी मोठ्याप्रमाणात गर्दी केल्याचं दिसून आलं.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात…

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

pimpri chinchwad newspune live newsPune newspune water tank collapseपिंपरी चिंचवडपुणे अपघातपुणे दुर्घटनापुणे पाण्याची टाकी कोसळलीपुण्यात पाण्याची टाकी कोसळलीभोसरीत पाण्याची टाकी कोसळली
Comments (0)
Add Comment