Nilesh Rane joins Eknath Shinde led Shiv Sena : नीलेश राणेंच्या शिवसेना प्रवेशाला त्यांचे पिता भाजप खासदार नारायण राणेही उपस्थित होते.
दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जोरदार इनकमिंग सुरू आहे. परंतु, मागील काही दिवसांत पक्षप्रवेशांमध्ये भारतीय जनता पक्षातून येणाऱ्या नेत्यांचाच भरणा असल्याने, ‘या नेत्यांना धर्मनिरपेक्षतेचे कोणते औषध पाजून तात्काळ पक्षात प्रवेश दिला जातो,’ अशा नाराजीची कुजबुज पक्षात सुरू आहे. पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांबाबत साधकबाधक विचार करूनच निर्णय घेण्यात येईल, असे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले होते. आधीच, भाजप नेत्यांच्या प्रवेशावरून अस्वस्थता असताना, पवार यांच्यावर वैयक्तिक टीका करणाऱ्या लक्ष्मण ढोबळे यांना बुधवारी पक्षात घेतल्याने त्यात भर पडली आहे.
२०१९च्या विधानसभेत निवडून आलेले ५३ पैकी ३९ आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शरद पवार यांच्या पक्षात घाऊक प्रमाणात नेत्यांचा पक्षप्रवेश होण्याची अटकळ बांधण्यात येत होती. त्यामुळे, संकटकाळात पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये, तसेच इतर पक्षातील नेत्यांना प्रवेश देताना कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घ्यावात, अशी उघड भूमिका आमदार रोहित पवार यांनी मांडली होती. त्यावर भाष्य करताना, ‘पक्षात येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाची पार्श्वभूमी पाहून पक्षांतर्गत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल,’ असे शरद पवार यांनी स्पष्ट केले होते.
Narayan Rane : डोळ्यादेखतच लेकाने भाजप सोडली, शिवसेना प्रवेश सोहळ्याला राणेंची उपस्थिती, शिंदेंना दिल्या शुभेच्छा
दरम्यान, विधानसभा निवडणुकीची कुणकुण लागल्यापासून पक्षांतराचे सत्र सुरू झाले. भाजपचे हर्षवर्धन पाटील, समरजीतसिंह घाटगे, सूर्यकांता पाटील, संदीप नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. गेली दहा वर्षे भाजपमध्ये असलेले आणि शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका करणारे लक्ष्मण ढोबळे यांनाही बुधवारीच पक्षप्रवेश देण्यात आला.
पक्षफुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेले राजेंद्र शिंगणे, आमदार दीपक चव्हाण यांनाही पक्षाने पुन्हा घेतले. याच विषयावर मागील आठवड्यात प्रतिक्रिया देताना, ‘नेते-कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणारे नेतृत्व भाजपमध्ये राहिलेले नाही. आता संधिसाधू नेत्यांनी भाजपवर पकड मजबूत केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांमध्ये ८० टक्के नेते भाजपचेच आहेत,’ असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले होते.