MNS Bhandup Candidate Issue: मनसेने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, मात्र ही यादी पाहून एका निष्ठावंत कार्यकर्त्याचा हिरमोड झाला. मनसेच्या स्थापनेपासून साथ दिलेला कार्यकर्ता आता राज ठाकरेंचा निर्णय मान्य करणार की काही वेगळा निर्णय घेणार, हे पाहावं लागेल.
हायलाइट्स:
- मनसेची उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
- भांडुपमधून शिरीष सावंत यांना उमेदवारी
- इच्छुक संदीप जळगावकरांकडून नाराजी व्यक्त
संदीप जळगावकर हे एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. ते मनसेच्या स्थापनेुपासून मनसेसोबत आहेत. २०१९ मध्ये त्यांनी विधानसभेचं तिकीट देण्यात आलं होतं. तेव्हा त्यांना मुंबईतील मनसेच्या सर्व उमेदवारांपेक्षा अधिक मतं मिळाली होती. त्यामुळे यंदा त्यांनाच तिकीट मिळणार अशी आशा कार्यकर्त्यांना होती. पण, जेव्हा मनसेने आपली पहिली यादी जाहीर केली त्यात जळगावकरांचं नाव नव्हतं. त्यामुळे जळगावकर हे दुसऱ्या यादीत तरी त्यांचं नाव असेल या आशेवर होते. दुसऱ्या यादीत भांडुपची उमेदवारी तर जाहीर झाली. पण, ती पाहताच जळगावकर यांना धक्का बसला. कारण, त्यांच्या जागी पक्षाने शिरीष सावंत यांना उमेदवारी दिलेली होती. मनसेच्या या निर्णयाने पक्षातील कार्यकर्तेही नाराज झाले आहेत.
MNS Candidate List: मनसेकडून उमेदवार जाहीर, यादी पाहून निष्ठावंताला धक्का; थेट राज ठाकरेंच्या भेटीला गेला अन्…
त्यामुळे संदीप जळगावकर हे लगेच कार्यकर्त्यांसह राज ठाकरेंच्या भेटीला कृष्णकुंजवर गेले. यावेळी त्यांनी शर्मिला ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांच्यापुढे नाराजीही व्यक्त केली. तसेच, भाडुप मतदारसंघातील उमेदवार बदलावा अशी मागणीही केली. पण, उमेदवार बदलता येणार नाही असं नांदगावकरांनी त्यांनी सांगितलं. त्यामुळे आथा पदाधिकारी वेगळी भूमिका घेतात की काय, हे पाहावं लागणार आहे.