भांडुपनंतर पुण्यात राज ठाकरेंना मोठा धक्का, कट्टर नेत्याचा पक्षाला रामराम

Ranjit Shirole Resigns from MNS Party: महाराष्ट्र नविनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस रणजित शिरोळे यांनी आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत मनसेला रामराम ठोकला आहे.

हायलाइट्स:

  • उमेदवारीवरुन मनसेत गदारोळ!
  • भांडुपनंतर पुण्यात राज ठाकरेंना मोठा धक्का
  • कट्टर नेत्याचा पक्षाला रामराम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
रणजित शिरोळे राजीनामा

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर होताच नाराजीनाट्य, बंडखोरीला ऊत आला आहे. ज्याचा मोठा धक्का राज ठाकरेंच्या मनसेला बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस रणजित शिरोळे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. तसेच भांडुपमध्ये मनसेचे नाराजी नाट्य पाहायला मिळाले असून शिरीष सावंत यांना उमेदवारी घोषित केल्याने विभाग अध्यश्र संदीप जळगावकर यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र नविनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस रणजित शिरोळे यांनी आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत मनसेला रामराम ठोकला आहे. ”मी मनसे स्थापन झाल्यापासून मनसेसोबत काम करत आहे. बऱ्याच जबाबदाऱ्या मला दिल्या, अनेक कामे दिली, निवडणुका लढवल्या. मी शिवाजीनगर मतदारसंघात काम करत आहे. आता घडामोडी घडत आहेत,मी निवडणूक कशी लढवावी. मनसेने अजून उमेदवारी जाहीर केली नाही, त्याबद्दल काय घडलं माहिती नाही. मी निवडणूक लढवायची की नाही हे अजून ठरवलं नाही. मी नाराज नाहीय आणि रागात घेतलेला निर्णय देखील नाहीय. मी राज ठाकरे यांना सांगितलेलं नाही. तुमच्या माध्यमातून राज ठाकरे यांना कळेल. मी सामजिक जबाबदारी आहे म्हणून काम करत राहीन”, अशी प्रतिक्रिया शिरोळे यांनी यावेळी दिली.

मनसेकडून उमेदवार जाहीर, यादी पाहून निष्ठावंताला धक्का

दरम्यान, भांडूपमध्ये देखील एका मनसेच्या निष्ठावंत नेत्याला चांगलाच धक्का बसला आहे. या यादीत मनसेने भांडुप विधानसभा मतदारसंघातून शिरीष सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे मनसेचे विभागप्रमुख संदीप जळगावकर यांना मोठा धक्का बसला आहे. या विधानसभा मतदारसंघातून संदीप जळगावकर हे इच्छुक होते. मात्र, मनसेने त्यांच्याजागी शिरीष सावंत यांना उमेदवारी दिली. मनसेने विधानसभा निवडणुकीत संदीप जळगावकर यांचा पत्ता कट केला. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी मनसेने २२५ मतदारसंघात निरीक्षक नेमले होते. यापैकी एक होते शिरीष सावंत, त्यांच्यावर भांडुप विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Maharashtra Navnirman SenaMNSpune ranjit shirole resignationraj thackeray breaking newsranjit shirole breaking newsपुणे रणजित शिरोळे राजीनामामनसेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनारणजित शिरोळे ब्रेकिंग बातम्याराज ठाकरे ब्रेकिंग बातम्या
Comments (0)
Add Comment