Finance Horoscope Today 25 October 2024 In Marathi : 25 ऑक्टोबर, मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फारसा ठिक नाही, कर्ज घेवू नका, परतफेड कठिण जाईल. वृषभ राशीसाठी व्यवसायातील नवीन गुंतवणूक लाभदायक असेल. सिंह राशीच्या जातकांचे मन भटकू शकते तसेच रागावर नियंत्रण हवे. वृश्चिक राशीचे टेन्शन वाढण्याची शक्यता असून मकर राशीच्या लोकांना मौल्यवान वस्तू मिळणार आहे. तर मीन राशीचा समाजात मान-सन्मान वाढेल. चला तर करिअर आणि आर्थिक बाबतीत आजचा दिवस कसा असेल ते पाहूया.
मेष आर्थिक राशिभविष्य : कर्ज घेवू नका, परतफेड कठिण जाईल
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. तुम्ही बँक, एखादी संस्था किंवा व्यक्ती कडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर आज घेवू नका. कर्ज चुकवणे तुम्हाला कठीण जाईल. आज तुम्हाला कामात जुन्या मित्रांचा सहकार्य मिळेल. पत्नीकडून तुम्हाला मदत मिळण्याची शक्यता आहे. ऑफिस आणि व्यवसायात काम वाढल्यामुळे खूप मेहनत करावी लागेल.
वृषभ आर्थिक राशिभविष्य : व्यवसायात नवीन गुंतवणूक लाभदायक
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक असून तुम्ही खूप व्यस्त राहणार आहात. तुमची धावपळ जास्त आहे पण तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता आहे. तेव्हा सावध राहा आणि काळजी घ्या. तुमची निर्णय घेण्याची क्षमता उत्तम असून आज कठिण कामे मार्गी लागतील. व्यवसायात नवीन कामांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर वेळ उत्तम आहे. संध्याकाळी कुटुंबासोबत मंगलकार्यात सहभाही होणार आहात.
मिथुन आर्थिक राशिभविष्य : अनावश्यक खर्च जास्त होणार
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खर्चिक आहे. अनावश्यक खर्च आज जरा जास्तच होईल. तुम्ही आजारी असाल तर आजार जास्त त्रास देणार आहे. सामाजिक कार्य करताना अडचणी येतील. अचानक धनलाभाचे योग आहेत. आज आध्यात्मिक गोष्टींकडे वळणार आहात. संध्याकाळी संगीताच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल.
कर्क आर्थिक राशिभविष्य : ऑफिसमध्ये सहकारी मदत करतील
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. मुलांकडून चांगली बातमी मिळेल त्यामुळे मुलांवरचा तुमचा विश्वास अधिक वाढेल. ऑफिसमध्ये सहकारी मदत करतील त्यामुळे कामे मार्गी लागतील. तुम्ही शोभेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करणार आहात. आज विरोधक शांत असतील तसेच तुमची प्रगती पाहून त्यांचा जळफळाट होईल. व्यवसायात नवीन डिल करताना पेपर तपासून पहावेत. आर्थिक स्थीती ठिक असेल.
सिंह आर्थिक राशिभविष्य : मन भटकू शकते, रागावर नियंत्रण हवे
सिंह राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस संमिश्र फल देणार आहे. मानसिक अशांती आणि उदास वातावरण यामुळे तुमचे मन भटकू शकते. आई-वडिलांचे सहकार्य आणि आशिर्वादामुळे तुम्ही संकटातून बाहेर पडाल. सासरकडून नाराजीचा सुर असले. तुम्ही मधुर वाणीचा वापर करा आणि रागावर नियंत्रण ठेवा. डोळ्यांसंदर्भात उपचार सुरु असेल तर आज तुम्हाला आराम मिळेल.
कन्या आर्थिक राशिभविष्य : अनावश्यक खर्चाचा योग
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे. आज तुम्ही धाडसाने कठिण कामे मार्गी लावणार आहात. आई वडिलांचे आशिर्वाद तुमच्या कामी येणार आहेत. तुम्ही कोणतेही काम करताना आई वडिलांचे नाव घ्या. कामात यश मिळेल. पत्नीचा आजार वाढण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चाचा योग असून खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. व्यवसायात लाभ आहे. लोकांनी मदत मागितली तरच मदत करा.
तुळ आर्थिक राशिभविष्य : ऑफिसमध्ये अधिकार वाढतील
तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी आहे. तुमचे अधिकार ऑफिसमध्ये वाढणार आहेत त्यामुळे विरोधक शांत होतील. बँक बॅलन्स वाढल्यामुळे तुम्ही समाधानी असाल. घरच्यांसाठी खरेदी करा, घरातील वातावरण अधिक आनंदी होईल. नवीन गोष्टीत गुंतवणूक करणे शुभलाभ देणारे आहे. व्यवसायात उत्तम नफा आहे.
वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : टेन्शन वाढण्याची शक्यता
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. तुम्हाला कोणत्यातरी गोष्टीची काळजी वाटत राहील. मन अशांत असेल आणि टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत तुम्ही ध्येयाने विरोधकांवर विजय मिळवाल. एखादा वाद सुरु असेल तर त्यावर तोडगा निघेल. व्यवसायात वाढ करायची असेल तर थोडं थांबा तसेच तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. आर्थिक स्थिती ठिक ठिक असेल.
धनू आर्थिक राशिभविष्य : आर्थिक स्थिती उत्तम, दानधर्म करणार
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या ज्ञानात भर पडणार आहे आणि त्याचा तुम्हाल भविष्यात लाभ होईल. आज धार्मिक कार्यात रुची घेणार आहात. तसेच आर्थिक स्थिती उत्तम असल्यामुळे दानधर्म करणार आहात. संध्याकाळी पोटाचा आजार त्रास देईल डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा.
मकर आर्थिक राशिभविष्य : मौल्यवान वस्तू मिळणार
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला मौल्यवान वस्तू मिळणार आहे. दरम्यान आज अनावश्यक खर्च होवू शकतो. तुम्ही खर्च करणे टाळण्याचा प्रयत्न कराल पण तसे होणार नाही. सासरकडून मान-सन्मानात वाढ होणार आहे. व्यवसायात फोकस वाढेल जे नफ्याच्या दृष्टीकोनातून उत्तम आहे. नवीन गोष्टीत गुंतवणूक करा, भविष्यकाळात फायदा होईल.
कुंभ आर्थिक राशिभविष्य : खर्च मर्यादित असतील, बचतीकडे लक्ष द्याल
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही काहीतरी नवीन शोध घेणार आहात. तसेच तुमचे खर्च मर्यादित स्वरुपाचे असतील. तुम्ही बचतीकडे कटाक्षाने लक्ष देणार आहात.कुटुंबीयांकडून विश्वासघात होण्याची शक्यता आहे, तेव्हा सावध राहा. प्रवासाचा योग आहे त्याचा लाभ घ्या.
मीन आर्थिक राशिभविष्य : समाजात मान-सन्मान वाढणार
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे. मुलांच्या बाबतीत तुम्ही नाराज असाल तर आज नाराजी दूर होईल. तुमच्या आनंदी स्वभावामुळे इतर लोक तुमच्यासोबत बोलायला येतील तसेच संबंध प्रस्थापीत करतील. याचा तुम्हाला भविष्यात लाभ होईल. सामाजिक मान-सन्मान वाढल्यामुळे तुमचे मनोबल द्विगुणीत होईल. घरात वातावरण आनंदी तसेच आर्थिक स्थिती व्यवस्थित असेल.