Sharad Pawar Solapur Candicate : सोलापुरात शरद पवारांनी राहुल गांधीच्या पठ्ठ्यांला बाजूला करत महेश कोठेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सोलापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसच्या गोटात नाराजी असल्याची चर्चा आहे.
चालक आहे, जनतेची सेवा करणार; महेश कोठे
राष्ट्रवादीकडून सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळालेले महेश कोठे यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेत जल्लोष साजरा केला. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघात वीस वर्षांपासून हा भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. त्यामुळे महेश कोठे आणि भाजपचे विजयकुमार देशमुख यांच्यातील निवडणूक अटीतटीची असणार आहे. शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी जनतेचा मालक म्हणून नव्हे तर चालक म्हणून काम करणार आहे, असं महेश कोठे म्हणाले.
राहुल गांधींचा पठ्ठ्या सुदीप चाकोतेंच्या गोटात नाराजी
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा आणि न्याय यात्रा अशा दोन यात्रा काढल्या होत्या. सोलापुरातील सुदीप चाकोते या दोन्ही रॅलीत राहुल गांधींसोबत होते. त्यामुळे सुदीप चाकोते यांना राहुल गांधींचा पठ्ठ्या म्हणून ओळखले जात होते. सोलापूर शहर उत्तर मतदार संघात सुदीप चाकोते यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु तुतारीला ही जागा सुटल्याने सुदीप चाकोतेंच्या गोटात नाराजगी पसरली आहे.
Solapur News : शरद पवारांनी भाकरी फिरवली; राहुल गांधीच्या पठ्ठ्याला बाजूला करत महेश कोठेंना तिकीट
दरम्यान, मागील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. शरद पवारांची साथ सोडून जवळपास ४० आमदार अजित पवारांसोबत गेले होते. काही मोजके जे शरद पवारांसोबत राहिले, त्यांना आता पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. बारामतीमध्ये शरद पवारांनी अजित पवारांविरोधात नातू युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे.