सायकलवरुन भरला उमेदवारी अर्ज, कारण… अलिबागमध्ये तिकीट मिळालेल्या चित्रलेखा पाटील कोण?

Alibaug Chitralekha Patil : अलिबागमध्ये शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी सायकलवरुन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अलिबागमध्ये तिकीट मिळालेल्या चित्रलेखा कोण आहेत? त्यांनी सायकलवरुन अर्ज दाखल का केला?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अमुलकुमार जैन, रायगड : शेतकरी कामगार पक्षाच्या शेकापंच्या अधिकृत उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी गुरुवारी २४ ऑक्टोबर रोजी दुपारी अलिबागमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच अलिबाग अर्बन बॅंकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील यांनीदेखील उमेदवारी अर्ज उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्याकडे दिला. चित्रलेखा पाटील यांचे अलिबागमध्ये शेतकरी भवन येथे आगमन होताच ‌‘चिऊताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, लाल बावटे की जय, लढेंगे जितेंगे’ अशा घोषणा दिल्या. चित्रलेखा पाटील यांचे यावेळी शेकाप भवनमध्ये औक्षण करण्यात आले. शेकाप सरचिटणीस माजी आ. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

२२ हजार मुलींना वाटलेल्या सायकली

चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांचे अलिबागमध्ये शेतकरी भवन येथे आगमन होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. कार्यकर्त्यांसह महिलांनी भवनसमोर गर्दी केली होती. चित्रलेखा पाटील यांनी जिल्ह्यात २२ हजार सायकली मुलींना गावोगावी दिल्या आहेत. या सायकलवर बसून अनेक गावे, वाड्यांमधील मुली शाळेत जात आहेत.
रायगडमध्ये चार जागांसाठी शेकाप आग्रही? राज्यभरात २० जागांची मागणी करणार
प्रगती आणि बदलाचे स्वरुप असलेल्या सायकवर स्वार होऊन चित्रलेखा पाटील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापर्यंत दाखल झाल्या. गुरुवारी २४ ऑक्टोंबर रोजी सायकल चालवून मोजक्याच शेकापच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सोबतीने उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
Washim News : तीन दिवसांपूर्वी पक्षप्रवेश केलेल्या उमेदवाराला ठाकरेंकडून तिकीट, कोण आहे डॉ. सिद्धार्थ देवळे?

जनहितासाठी प्रतिनिधीत्व करणार

बदलत्या राजकारणामुळे महिला, तरुण पिढी, गोरगरीब जनता दुर्लक्षित झाले आहेत. अलिबाग विधानसभा मतदार संघातून भरलेला उमेदवारी अर्ज हा सुशिक्षित, गोरगरीब जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी, त्यांच्या विकासासाठी, शिक्षणाला प्रगतीवर नेणारा आणि मुली, महिला यांच्यासाठी आशावादी असणारा आहे. भविष्यात जनतेच्या हितासाठी प्रतिनिधीत्व करणार, असा विश्वास शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख तथा शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी व्यक्त केला.

Chitralekha Patil : सायकलवरुन भरला उमेदवारी अर्ज, कारण… अलिबागमध्ये तिकीट मिळालेल्या चित्रलेखा पाटील कोण?

त्या पुढे म्हणाल्या, सायकलचे चाक नेहमीच पुढे नेणारे आहे. प्रगतीचे, बदलाचे, विकासाचे हे प्रतिक आहे. तोच विचार घेत ग्रामीण भागातील मुलींना सायकली दिल्या आहेत. त्यामुळे सायकलवाली ताई म्हणून ओळख निर्माण झाली आहे. हेच विकासाचे चाक घेऊन पुढे जात आहे. अलिबाग विधानसभा मतदार संघातून जनताच मला मतपेटीतून कौल देईल, असा विजयाचा आशावाद, विश्वास शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी व्यक्त केला आहे.

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

alibaug vidhan sabharaigadraigad shekap chitralekha patilraigad shekap newsraigad vidhan sabha electionचित्रलेखा पाटील सायकलवर उमेदवारी अर्ज दाखलरायगड विधानसभा निवडणूक २०२४रायगड शेकाप विधानसभाशेकाप महिला आघाडी नेत्या चित्रलेखा पाटीलशेकाप महिला उमेदवार अलिबाग चित्रलेखा पाटील
Comments (0)
Add Comment