Dharashiv Ranjit Patil Candidature Announced: परंडा भूम मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे हे या मतदारसंघातून इच्छुक होते. त्यांनी तसा प्रचारही चालू केला होता.
हायलाइट्स:
- परंडा भूम मतदार संघाचा तिढा सुटला
- परंड्यातून या पट्ट्याला भेटली उमेदवारी
- उद्धव ठाकरेंनी एबी फॉर्म दिला
आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्याविरुद्ध रणजीत पाटील हा नवखा तरुण असणारा असून या मतदारसंघातून कोण विजयी होईल हे २३ नोव्हेंबर नंतर दिसून येईल. दिवंगत ज्ञानेश्वर पाटील हे या मतदारसंघाचे दोन वेळा आमदार राहिल्यामुळे त्यांचा जनसंपर्क या मतदारसंघात दांडगा होता. तसेच परांडा भूम हा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.
राहुल मोटे यांच्या भूमिकेकडे लक्ष
राहुल महारुद्र मोटे हे परंडा भूम मतदार संघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून विधानसभेत गेलेले आहेत. त्यांचे वडील महारुद्र मोठे हे दोन वेळा याच मतदारसंघातून आमदार म्हणून विधानसभेत केलेले होते. या निवडणुकीत राहुल मोटे हे इच्छुक होते पण सदर मतदारसंघ हा शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे गटाला सुटला असून शिवसेनेने रणजीत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर राहुल मोटे यांचा पत्ता कट झाल्याने ते आता कुठला निर्णय घेतात याकडे या मतदारसंघातील मतदाराचे लक्ष लागलेलं आहे.