Varsha Gaikwad meets Uddhav Thackeray : वर्सोवा मतदारसंघात अस्लम शेख यांची त्यांचे जावई सैफ खान यांना उमेदवारी मिळावी अशी इच्छा आहे.
हायलाइट्स:
- महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत काँग्रेसने उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
- वर्सोवा मतदारसंघात अस्लम शेख आणि सैफ खान यांची उमेदवारीसाठी चर्चा झाली.
- काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुंबईतील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.
वर्षा गायकवाड या उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे कुटुंबाचे मतदान असते. लोकसभेला हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला होता. मविआच्या एकीमुळे ठाकरेंनी माझं मत काँग्रेसच्या वर्षाताईंना असं सांगितलं होतं. त्यामुळे ठाकरेंनी मतदान केलेल्या उमेदवारानेच आता काँग्रेसला जागा सोडण्याचं आव्हान केल्याचं दिसतं.
दरम्यान, उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले. वांद्रे पूर्वची उमेदवारी यादीतच जाहीर झाल्याने त्या जागेबाबत चर्चा होणेच शक्य नाही. भायखळा, वर्सोवा मतदारसंघांबाबतही शिवसेना (उबाठा) ठाम असल्याचे कळते.
Uddhav Thackeray : ठाकरेंनी मतदान केलेली उमेदवार ‘मातोश्री’वर; म्हणते… दादा, ‘ती’ सीट काँग्रेसला सोडा ना
राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप निश्चित करण्यासाठी अनेक दिवसांपासून सर्व प्रमुख नेत्यांच्या बैठकांचा धडाका सुरू होता. या चर्चेत प्रमुख नेत्यांमध्ये हमरीतुमरीही झाली. त्यानंतर बुधवारी झालेल्या बैठकीत यावर तात्पुरता तोडगा काढण्यात आला. मात्र मुंबईतील आणि विदर्भातील जागांबाबत तोडगा न निघाल्याने गुरुवारी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यासह माजी मंत्री अस्लम शेख यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत मुंबईतील जवळपास सर्वच राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. त्याशिवाय भायखळा आणि वर्सोवा या मतदारसंघांबाबतही चर्चा करण्यात आल्याचे कळते.
काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार हेसुद्धा संध्याकाळी ‘मातोश्री’वर पोहोचल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. रामटेक विधानसभा मतदारसंघासाठी केदार आणि ठाकरे यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाली, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. विदर्भातील इतरही काही जागांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते.