Narendra Mehta: गुरुवारी १२ इच्छुक उमेदवारांनी २४ अर्ज निवडणूक कार्यालयातून घेतले आहेत. यात वंचित बहुजन आघाडी, बहुजन विकास आघाडी आदी राजकीय पक्षातून व अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
तयारीत मिरा-भाईंदर विधानसभेची जागा लढवण्यासाठी गुरुवारी १२ इच्छुक उमेदवारांनी २४ अर्ज निवडणूक कार्यालयातून घेतले आहेत. यात वंचित बहुजन आघाडी, बहुजन विकास आघाडी आदी राजकीय पक्षातून व अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी भाजप आणि अपक्ष असे दोन अर्ज घेतले आहेत. यासह त्यांची पत्नी सुमन मेहता यांच्या नावे देखील भाजप व अपक्ष असे अर्ज घेण्यात आले आहेत. मेहता भाजपमधून ही जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्याकरता मागील दोन वर्षांपासून ते तयारी करत आहेत. अपक्ष आमदार गीता जैन व भाजप विधानसभा प्रमुख रवी व्यासही भाजपकडून ही जागा लढवण्यास इच्छुक आहेत. या जागेवर शिवसेना शिंदे गटाकडूनही दावा करण्यात आला आहे.
जैन शिवसेनेकडूनही तिकीट मिळावे, यासाठी प्रयत्न करीत आहेत. परिणामी महायुतीत तिढा निर्माण झाला आहेत. याच कारणास्तव अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही जागा कोण लढवणार? तसेच उमेदवार कोण असेल हे स्पष्ट आहे. येत्या दोन दिवसांत ते स्पष्ट होणार आहे. जैन यांनीही भाजप शिवसेनेसह अपक्ष अर्ज घेतला आहे.