काँग्रेसने माझ्यासोबत गेम केला, दादांच्या गटात पक्षप्रवेश करताच सिद्दिकींचे खळबळजनक आरोप

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दिकी यांनी दादा गटामध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीमध्ये झिशान सिद्दिकी यांना वांद्रे पूर्व येथून उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करताच सिद्दिकी यांनी काँग्रेसवर खळबळजनक आरोप केला आहे.

हायलाइट्स:

  • काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दिकी यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दादा गटामध्ये प्रवेश केला आहे.
  • झिशान सिद्दिकी यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करत त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सुनील तटकरे, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानले.
  • झिशान सिद्दिकी यांचा वांद्रे पूर्व मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवण्याचा विश्वास आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
काँग्रेसने माझ्यासोबत गेम केला, दादांच्या गटात पक्षप्रवेश करताच सिद्दिकींचे खळबळजनक आरोप

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दिकी यांनी दादा गटामध्ये प्रवेश केला आहे. मुंबईमधील पक्षकार्यालयात अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. लोकसभा निवडणुकीआधी सिद्दिकी यांनी दादा गटामध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झिशान सिद्दिकी यांनी दादा गटामध्ये प्रवेश करत काँग्रेसला धक्का दिला आहे. पक्षप्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.माझ्यासाठी आणि परिवारासाठी भावनिक दिवस आहे. या कठिण काळात सुनील तटकरे, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी माझ्यावर विश्वास दाखवला तो मी सार्थ ठरवेल. वांद्रे पूर्व मतदारसंघातील जनतेवर माझा विश्वास असून ते मला जिंकवतील. या मतदारसंघातून मी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवेल. काँग्रेस पक्षाने माझ्यासोबत संपर्क साधण्याचा संपर्क साधला, मात्र कठिण काळातही काँग्रेसने माझ्यासोबत गेम केला. मला बोलावलं, थांबवलं गेलं पण त्यांचा ढोंगीपणा जनतेसमोर आला आहे. जनता त्यांना आपल्या मतांमधून उत्तर देईल. माझ्या वडिलांचा अधुर राहिलेलं स्वप्न पूर्ण करणार आहे. वरूण सरदेसाई असो नाहीतर दुसरं कोणीही असो, वांद्रे पूर्वची जनता मला मोठ्याधिक्क्याने विजयी करणार असल्याचं झिशान सिद्दीकी यांनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीचा राष्ट्रवादीने दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये सात उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलीये. यामध्ये भाजपच्या दोन माजी खासदारांने उमेदवारी मिळाली आहे. इस्लामपूर – निशिकांत पाटील, वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी, अणुशक्तीनगर – सना मलिक, वडगाव शेरी – सुनिल टिंगरे, शिरुर – ज्ञानेश्वर कटके, तासगाव – संजयकाका पाटील आणि लोहा कंधार – प्रताप पाटील चिखलीकर यांचा समावेश आहे.

दरम्यान, वांद्रे पूर्व येथे महाविकास आघाडीतून ठाकरे गटाने वरूण सरदेसाई यांना उमेदवारी दिली आहे. झिशान सिद्दिकी यांनी आणि वरूण सरदेसाई यांच्यात ही लढत रंगणार आहे. वरूण सरदेसाई यांची पहिलीच निवडणुक असल्याने पूर्ण ताकदीनिशी ते मैदानात उतरतील. मात्र बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे झिशान यांना सहानुभूतीचा फायदा होऊ शकतो.

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

ajit pawarNCP Marathi NewsZeeshan SiddiqueZeeshan Siddique join NCPZeeshan Siddique Marathi Newsझिशान सिद्दिकीझिशान सिद्दिकी राष्ट्रवादी पक्षप्रवेश
Comments (0)
Add Comment