वो देवा भाऊ देवेंद्र हैं; फडणवीस आधुनिक अभिमन्यू, ठाकरे-पवार दुर्योधन, नव्या गाण्याने खळबळ

Devendra Fadnavis Song: देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत. त्यापूर्वी सोशल मीडियावर त्यांच्या समर्थनार्थ एक गाणं चांगलंच व्हायरल होत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी उेमदवारी भरण्यास सुरुवात झाली आहे. अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. तर काही उमेदवार आज अर्ज दाखल करणार आहेत. नागपुरातून उमेदवार असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसह आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. नागपुरातील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

यादरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ एक नवं गाणं समोर आलं आहे. या नव्या गाण्यातून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सडकून टीका करण्यात आली आहे. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आधुनिक अभिमन्यू म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

या गाण्यात शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवारांचं चक्रव्यूह देवा भाऊ भेदणार, असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दुर्योधनाची उपमा या गाण्यात देण्यात आली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी याला कसं उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे.
Sunil Tingre: काय पोर्शे, काय पिझ्झा, काय अग्रवाल; सारं बाजूला ठेवत अजितदादांची पुन्हा सुनिल टिंगरेंना संधी
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर I Support Narendra Modi नावाच्या अकाऊंटवरुन हे गाणं पोस्ट करण्यात आलं आहे. भाजप आणि फडणवीस चाहत्याने हे गाणं शेअर केल्याचं दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, मी आधुनिक अभिमन्यू आहे, मला चक्रव्यूह भेदता येतं… त्यावरुनच हे गाणं तयार केल्याचं दिसून येतं. सध्या फडणवीस चाहत्यांमध्ये या गाण्याची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.

पाहा फडणवीसांचं आधुनिक अभिमन्यू हे गाणं…

देवेंद्र फडणवीस आज नागपुरात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी फडणवीस मोठं शक्तीप्रदर्शन करतील. अर्ज दाखल करण्यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी गडकरींच्या पत्नी कांचन गडकरी यांनी त्यांचं औक्षण केलं.

Devendra Fadnavis: वो देवा भाऊ देवेंद्र हैं; फडणवीस आधुनिक अभिमन्यू, ठाकरे-पवार दुर्योधन, नव्या गाण्याने खळबळ

फडणवीसांना आशीर्वाद देण्यासाठी नागा साधूही नागपुरात दाखल झाले आहेत. तर, मोठ्या गाजवाज्यासह फडणवीस हे उमेदवारी अर्ज दाखल करायला जातील.

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

adhunik abhimanyu songdevendra fadnavis nominationSharad PawarUddhav ThackerayVidhan Sabha Nivadnukदेवेंद्र फडणवीसदेवेंद्र फडणवीस उमेदवारीदेवेंद्र फडणवीस नवं गाणं
Comments (0)
Add Comment