विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी राज्यभरात बंदोबस्त वाढवला आहे. छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांना पाहताच तरूण पळू लागला त्यानंतर काय घडलं जाणून घ्या.
संशयास्पद हालचाली करत बसमधून उतरला पोलिसांना पाहून पळाला. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून पकडलेल्या 27 वर्षे तरुणाकडे सात लाख 50 हजार व सोन्याचे दागिने आढळून आले. सापडलेला सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी रात्री अकरा वाजता करण्यात आली.
अजित सरकार वय 27 असे संशयित आरोपीचे नाव आहे. विधानसभा निवडणूक लागू झाल्यापासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नाकाबंदी करून तपासणी केली जात आहे. यामध्ये अवैध दारू विक्री, बेबिशोबी रोख रक्कम बाळगणाऱ्यांवर पोलीस लक्ष ठेवून आहे. दरम्यान बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास स्थिर सर्वेक्षण पथकाचे अंमलदार दिलीप सोनवणे, प्रभाकर पाटील, राजेश दाभाडे सिडको बस स्थानकावर कर्तव्यावर होते. रात्री अकरा वाजता एका बस मधून एक तरुण उतरला.तरुणाची हालचाल संशयास्पद होती. स्थिर सर्वेक्षण पथकाच्या पोलिसांना बघून तो पळायला लागला.
पोलिसांनी त्याला थांबण्यासाठी आवाज तिला मात्र त्याने चालण्याचा वेग वाढवला. यावेळी पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले. यावेळी त्याच्या बॅगमध्ये सात लाख 50 हजार रुपये रोख चार ग्राम सोने आणि अन्य धातूंच्या चार बांगड्या आढळून आल्या. याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी मी सराफ्याकडे नोकरीला असल्याचे सांगून पैसे त्यांच्या असल्याचे सांगितले. मात्र त्याच्याजवळ असलेले पैसे नव्या कोऱ्या बंडल मध्ये होते. दरम्यान हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पथक प्रमुख अमोल राठोड ,अमोल गायके, उपायुक्त नवनीत कावत, सहाय्यक आयुक्त रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.