Ajit Pawar On Baramati Election: राज्यात ताठ मानेने फिरता येईल अशी संधी बारामतीकर देतील असा विश्वास अजित पवंरांनी व्यक्त केला आहे. बारामतीकरांचा माझ्यावर विश्वास आहे, माझाही बारामतीकरांवर विश्वास आहे, असंही ते म्हणाले.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, ते म्हणाले मागील निवडणुकीमध्ये मला रेकॉर्ड ब्रेक १ लाख ६५ हजारांचे मताधिक्य देऊन बारामतीकरांनी निवडून दिले होते. यावेळी देखील बारामतीकर मला त्याच पद्धतीने विजयी करतील. मी माझी भूमिका लोकांसमोर मांडेल. प्रतिस्पर्धी देखील त्यांची भूमिका लोकांमध्ये जाऊन मांडतील. मागील सहा ते सात निवडणुकांमध्ये मला बारामतीकरांनी विजयी केले आहे. जेवढे शक्य होईल तेवढे काम मी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे. सुज्ञ बारामतीकर योग्य निर्णय घेतील. महाराष्ट्रामध्ये मी ताठ मानेने फिरू शकेल असं निकाल ते देतील असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
विधानसभेला अजित पवारांना कण्हेरीचा मारुती पावणार का?
लोकसभेला खासदार सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांच्यात झालेल्या लढतीनंतर विधानसभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार लढताना दिसतील. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेला देखील दोन्ही पक्षाचा प्रचाराचा शुभारंभ कण्हेरी येथील मारुती मंदिरात नारळ फोडून होणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ कण्हेरी येथील मारुती मंदिरात नारळ फोडूनच केला आहे. हीच परंपरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुढे नेली आहे.
Ajit Pawar: आता तरी कण्हेरीचा मारुती पावणार? बारामतीकर ताठ मानेने फिरण्याची संधी देतील, दादांना विश्वास
सोमवारी (दि. २८) अजित पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ येथील मारुती मंदिरामध्ये नारळ फोडून होणार आहे. लोकसभेला देखील दोन्ही पक्षाच्या वतीने येथूनच प्रचाराचा शुभारंभ झाला होता. लोकसभेला मात्र कण्हेरीच्या मारुतीरायाने आपला कौल खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाजूने दिला. विधानसभेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कण्हेरीचा मारुती पावणार का? अशी चर्चा बारामतीमध्ये आहे.