MVA Will Exchange Seat: महाविकास आघाडीत जागा बदल होणार असल्याची माहिती आहे. यामध्ये पुण्याच्या दोन महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. तीन ते चार जागांचा बदल होणार आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अद्यापही काही जागांसाठी रस्सीखेच सुरु असल्याचं चित्र दिसून येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून जागावाटप होण्याचा आधीच उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. याबाबत काँग्रेसने पत्र लिहून उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता शिवसेनेकडून राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या-यांच्या आग्रहाखातर तीन ते चार जागां बदलण्यात येणार असल्याची माहिती आहे. आता यामध्ये कोणाला कोणती जागा मिळणार हे पाहावं लागणार आहे. या बदलाची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे.
महायुतीमधील घटकपक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी नुकतीच जाहीर झाली आहे. मात्र, त्यांच्यामध्ये देखील काही जागांचा तिढा अद्यापही कायम आहे. अजित पवारांनी सांगितल्याप्रमाणे महायुतीमध्ये ११ जागांचा प्रश्न मार्गी लागणे बाकी आहे.
MVA Seat Sharing: मोठी बातमी! मविआत जागावाटपाचा पेच कायम, ठाकरेसेनेकडून जागा बदल, ‘या’ महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश
तर, महाविकास आघाडीच्या उर्वरित जागांच्या जागावाटपाकडे सध्या सर्व उमेदवारांचे लक्ष लागून आहे. पुण्यामध्ये काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर, शिरूर विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून अशोक पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, वडगाव शेरी विधानसभेमध्ये अजितदादा गटाच्या सुनिल टिंगरे यांच्या विरोधात बापूसाहेब पठारे यांच्यात लढत होणार आहे. मात्र, महाविकास आघाडीमध्ये दोन ते तीन जागांमध्ये बदल होणार असल्याने त्या जागा नेमक्या कुठल्या आणि कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.