भरधाव डंपरची दुचाकीला धडक, चेहरा चित्रविचित्र, ओळखणंही मुश्कील; दोघांचा जागीच मृत्यू

Ratnagiri Accident News: जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर आता पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने त्यांची ओळख पटली आहे. राघवेंद्र धुरी साई नगर परिसरात राहणारा आणि मुक्तेश्वर ठीक प्रशांत नगर परिसरात राहणारा आहे.

हायलाइट्स:

  • भरधाव डंपरची दुचाकीला धडक
  • दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
  • रत्नागिरी येथे भीषण अपघात
Lipi
डंपर बाईक अपघात दोघांचा मृत्यू

प्रसाद रानडे, रत्नागिरी : मिऱ्या नागपूर महामार्गावर रतन शहराजवळ टीआरपी येथे आज शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दोघांचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. डंपरची धडक बसून दुचाकीवरून जाणाऱ्या या दोघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की या दोघांचे चेहरे ओळखता येत नव्हते. त्यावेळेस सुरुवातीला या अपघातात मृत्यू झालेल्या या दोघांची ओळख पटवणे कठीण झालं होतं. त्यांना परिसरात ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी व नागरिकांनी तात्काळ रत्नागिरी रुग्णालयात हलवले आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर आता पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने त्यांची ओळख पटली आहे. राघवेंद्र धुरी साई नगर परिसरात राहणारा आणि मुक्तेश्वर ठीक प्रशांत नगर परिसरात राहणारा आहे. अशी या दोघांची नावे असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Sunil Tingre: काय पोर्शे, काय पिझ्झा, काय अग्रवाल; सारं बाजूला ठेवत अजितदादांची पुन्हा सुनिल टिंगरेंना संधी

मिऱ्या नागपूर महामार्गाचे रुंदीकरणाचे काम गेले कित्येक महिने सुरू आहे. या परिसरात डंपरसारख्या मोठ्या वाहनाची येथे वर्दळ कायम असते. या परिसरात यापूर्वीही काही अपघात घडले आहेत. डंपरची ठोकर बसल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. या महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे डंपरसारख्या मोठ्या अवजड वाहनांच्या वेगमर्यादेवर सध्या कोणाचे नियंत्रण नाहीय. या परिसरातून जाणाऱ्या डंपरसारख्या अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण घालण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होऊ लागली आहे. दुचाकी घेऊन जात असताना डंपरची भीषण धडक झाल्याने यामध्ये दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. ज्या डंपरमुळे या दुचाकीला धडक बसली त्या डंपरचा क्रमांक एमएच ०८ एच २२९२ असा आहे.

अपघातग्रस्त ज्या मोटरसायकलवरून प्रवास करत होते. त्या दुचाकीचा क्रमांक एमएच ०८ पी ००७४ असा आहे. या अपघात प्रकरणी संबंधित डंपर चालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी अशी मागणी आता परिसरातून होऊ लागली आहे. रत्नागिरी पोलिसांनी या सगळ्याची गंभीर दाखल घेतली असून सिव्हिल रुग्णालयात आणि घटनास्थळी रत्नागिरी पोलीस हजर झाले आहेत. टीआरपी परिसरात घटनास्थळी पंचनामा करण्याची कार्यवाही पोलिसांकडून सुरू आहे.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

accident newsdumper bike accident two dielatest marathi newsratnagiri accident newsअपघात बातम्याडंपर बाईक अपघात दोघांचा मृत्यूरत्नागिरी अपघात बातम्यालेटेस्ट मराठी बातम्या
Comments (0)
Add Comment