Maharashtra Election 2024: इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी अर्ज दाखल केला. त्याआधी झालेल्या सभेत बोलताना अजित पवारांनी आपल्याला बळ मिळण्यासाठी भरणे यांना निवडूण देण्याचे आवाहन केले.
भाषणाच्या सुरुवातीलाच अजित दादांनी स्पष्टपणे सांगितले की, मी आताच सांगतो यापुढे माझी सभा असेल तर मी इतरांची भाषणे ऐकणार नाही. मी येण्याआधी सर्वांची भाषणे उरका. मी आल्यानंतर एक भाषण ऐकेन आणि माईक हातात घेईन तरच मला महाराष्ट्रात सगळीकडे सभा घेता येईल. याला बोलू द्या, त्याला बोलू द्या, मी येण्याआधी काय बोलायचे आहे ते बोलून घ्या. अजितदादांनी यावेळी ते स्वत: २८ तारखेला अर्ज भरणार असल्याचे सांगितले.
विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्याची भूमिका महत्त्वाची आहे. १ वर्ष सरकारमध्ये नव्हतो, एक वर्ष करोनामुळे गेले. ३ वर्षात ६ हजार कोटींची निधी दिली असे सांगत अजित दादांनी आपल्याकडे कशासाठी निधी दिला याची लिस्ट असल्याचे दाखवले. उद्याला दत्तात्रय भरणे विजय झाले तर मला बळ मिळणार आहे आणि मला बळ मिळाले तर मी महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास करणार आहे, असे सांगत अजित पवारांनी भरणे यांना निवडूण देण्याचे आवाहन केले.
इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थितीत होते. दत्तात्रय भरणे हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असून गेल्या दहा वर्षापासून इंदापूरची धुरा ते सांभाळतायेत.भरणे पुन्हा एकदा आपले नशीब आजमावत आहेत.या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे हा टोकाचा संघर्ष पाहायला मिळणार आहे.