Vidhan Sabha Nivadnuk 2024: विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील काही जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशात सोलापूरमधील दक्षिण मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे.
मशाल आणि तुतारीचे नेत्यांनी फिल्डिंग लावली
महाविकास आघाडीमधील शिवसेनेचे अमर पाटील यांना दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाली अशी देखील चर्चा झाली.राष्ट्रवादी पक्ष (तुतारी)इच्छुक असलेले धर्मराज काडादी यांनी देखील शरद पवारांकडे साकडे घातले आहे.दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेस नेते दिलीप माने यांनी नाना पाटोळे यांच्याकडे फिल्डिंग लावली आहे. दक्षिण सोलापूर विधानसभेच्या जागेवर महाविकास आघाडी मधील सर्वच नेते फिल्डिंग लावली आहे.
सोलापूरमधील मुख्य रस्त्यावर दिलीप मानेंच घर; कार्यकर्त्यांमुळे रस्ता जाम
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडी तर्फे शिवसेनेला गेली आहे आणि त्या ठिकाणी अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.अशी माहिती वाऱ्यासारखी सोलापुरात पसरली. काँग्रेस नेते दिलीप माने यांचे समर्थक दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.काहीही करून दिलीप माने यांनाच काँग्रेस पक्षातर्फे दक्षिणची उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी यावेळी केली आहे. दिलीप माने यांचेच नेतृत्व दक्षिणला तारू शकते. असा सूर कार्यकर्त्यांमधून निघत आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावातील कार्यकर्ते आपल्या भावना मांडल्या आहेत.सोलापूर शहरात होटगी रोडवर असलेल्या दिलीप मानेंच्या सुमित्रा निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत रस्ता जाम केला होता.
सोलापुरात विधानसभा निवडणुकीत दिलीप मानें पॅटर्न दिसेल
काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे दिलीप मानेंच्या सुमित्रा निवासस्थानी येऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आणि दिलीप मानें समर्थकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.दक्षिण सोलापूरची जागा काँग्रेसला सुटेल,माझे नाना पाटोळे,खा प्रणिती शिंदे,आणि काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांशी चर्चा झाली आहे.दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा उमेदवार असेल अशी खात्री दिली.दिलीप माने,आणि पृथ्वी मानें यांनी देखील समजुत घातली.पृथ्वी माने यांनी बोलताना सांगली पॅटर्न करणार नाही तर सोलापूर पटर्न किंवा दिलीप माने असा नवा पॅटर्न सोलापूरच्या विधानसभा निवडणुकीत दिसेल असा अप्रत्यक्ष इशारा दिला.