चंद्रपूरच्या उमेदवारीवरून ‘वॉर’ पेटले; किशोर जोरगेवारांवरून पार संतापले; थेट दिल्ली गाठली!

Chandrapur Assembly constituency: किशोर जोरगेवार यांच्या भाजपमधील प्रवेशाच्या तयारीवरून सुधीर मुनगंटीवार नाराज झाले असून त्यांनी तातडीने दिल्ली गाठली आहे.

महाराष्ट्र टाइम्स

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाच्या तयारीवरून पक्षाचे ज्येष्ठ नेते वन मंत्री सुधीर मुनगंटीवार पार संतापले आहेत. त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कार्यकर्त्यांच्या भावना श्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्यासाठी थेट दिल्ली गाठली. चंद्रपूरच्या उमेदवारीवरून दोन वारांमध्ये ‘वॉर’ पेटले आहे.

जोरगेवार मूळ भाजपचे. कधी काळी ते मुनगंटीवार यांचे समर्थक होते. २००९ साली चंद्रपूर मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी राखीव झाला आणि त्यांनी दावेदारी केली. भाजपने नागपुरच्या नाना श्यामकुळे यांना तिथे उमेदवारी देऊन निवडून आणले. २०१४ मध्ये ते शिवसेनेकडून लढले. पराभूत झाले. २०१९ साली ते अपक्ष उभे झाले आणि विजयी झाले. प्रारंभी त्यांनी महाविकास आघाडीला आणि नंतर युतीला समर्थन दिले. यावेळी त्यांनी सगळ्याच पक्षात रुमाल टाकून बघितला. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार हे कळताच कार्यकर्ते खवळले. त्यांना पक्षात घेऊ नये म्हणून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फिल्डिंग लावली आहे.
मोठा पॉलिटिकल ड्रामा! महाविकास आघाडीतील दोघांनी एबी फार्मसह अर्ज भरल्याने खळबळ; माघार कोण घेणार?
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाबाबत पाच वर्षांपासून सातत्याने काम करणाऱ्यास उमेदवारी द्यावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अन्यथा भविष्यात कुणीही कार्यकर्ता संघटन चालवण्यासाठी काम करणार नाही. निष्ठावान ज्याने पाच वर्ष नव्हे, २५-२५ पक्षाचे काम केले, पक्ष, संघटना वाढवली त्यांच्याऐवजी ‘आयात’ करून आणलेल्यांना उमेदवारी दिली तर, संघटन विस्कळीत होण्याची शक्यता आहे, असा धोका सुधीर मुनगंटीवार यांनी मीडियाच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला.

पाच वर्षात अनेक पक्ष बदलणाऱ्यांना उमेदवारी देण्याचा विचार पक्ष करीत असल्यास पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता म्हणून कार्यकर्त्यांची नाराजी श्रेष्ठींना अवगत करणे गरजेचे आहे. यानंतर नेतृत्वाने काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. पण, नेत्यांपर्यंत कार्यकर्त्यांची भावना, संघटनेतील भाव आणि आशय पोहोचवले नाही तर, निवडणुकीनंतर सेवाभावी ऐवजी व्यावसायिक संघटन होईल, असा इशाराही मुनगंटीवार यांनी दिला.
फडणवीसांनी अर्ज भरण्यापूर्वी गडकरी म्हणाले, बाकीच्या नेत्यांना आपल्या मुलांच्या तिकिटाची चिंता, आम्हाला मात्र…
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या निष्ठावंतास उमेदवारी द्यावी यासाठी गुरुवारी ५०० ते ७०० कार्यकर्ते आले होते. इतक्या मोठ्या संख्येने ते दिल्लीला जाऊ शकत नाही. त्यांच्या भावना श्रेष्ठींपर्यंत पोहोचवा असा आग्रह त्यांनी केला, त्यामुळे दिल्लीला जात आहे असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
आताच सांगतो, यापुढे मी इतरांची भाषणे ऐकणार नाही; भाषणाच्या सुरुवातीला अजित दादांनी बजावले, पाहा काय घडले
अनेकदा पक्ष बदलणाऱ्यास त्यातून वाईट परिणाम कार्यकर्त्यांच्या मनावर होईल. पक्ष, कार्यकर्त्यांना संघटित ठेवणे अवघड होईल. निष्ठा, पक्ष बदलवणाऱ्यांना तिकीट उमेदवारी दिली तर, अशीच निष्ठा कार्यकर्ते बदलवतील. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. ब्रजभूषण पाझारे १९९० पासून काम करत आहेत. जिल्हा परिषद, पंचाय समिती सदस्य होते. निवडणुका जिंकले. कार्यकर्त्यासोबत चांगली वर्तणूक ठेवली. अशा निष्ठावान कार्यकर्त्याच्या पाठिशी पक्षाने राहावे, असेही मुनगंटीवार म्हणाले. दरम्यान जोरगेवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

maharashtra election 2024sudhir mungantiwar on kishore jorgewarVidhan Sabha Nivadnukकिशोर जोरगेवारचंद्रपूर विधानसभा मतदारसंघनागपूर ताज्या बातम्यासुधीर मुनगंटीवार
Comments (0)
Add Comment