Kagal Assembly Constituency: कागल विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची घोषणा सुरू होण्याआधीपासून वातावरण तापले होते. आज या तापलेल्या वातावरणाचा नवा अंक पहायला मिळाला.
कोल्हापुरातील कागल विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यात होणाऱ्या हाय प्रोफाईल लढतील पैकी कागलची एक निवडणूक समजली जात आहे. त्यामुळे अनेक जणांच्या नजरा या मतदारसंघाकडे राहून राहिल्या आहेत. यामुळे येथील कार्यकर्त्यांना जाणून घेण्यासाठी एका वृत्तवाहिनीचा कार्यक्रम कागलमधील गैभी चौकात आयोजित केला होता.
सुरुवातीला दोन्ही बाजूने समर्थक मुद्दे मांडत होते मात्र यावेळी काही मुद्द्यांवरून दोन्ही गटांमध्ये वादावादी सुरू झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की वादाच रूपांतर थेट हाणामारी झाली. एकमेकांची कॉलर पकडत दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांना भेटले, जोरदार घोषणाबाजी करत एकमेकांना अपशब्द वापरत एकमेकांवर धावून गेले. या सर्व राड्यादरम्यान रस्त्याच्या कडेला पार केलेल्या गाड्या खाली पडल्या. हा सर्व राडा सुरू असताना कार्यक्रमाच निवेदन करण्यासाठी आलेले अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांनी कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला मात्र आक्रमक झालेले कार्यकर्ते ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते. अक्षरशः कार्यकर्त्यांनी बाजूला सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामाच्या विटा उचलून एकमेकांवर फेकून मारू लागले या घटनेची माहिती मिळताच कागल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले.
कागल विधानसभा मतदार संघात दोन कट्टर विरोधक असलेले हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून या मतदारसंघात आरोप प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण गरम आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विशेष लक्ष देत असल्याने या मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच कार्यकर्ते भेटायचे फोडायचे आणि आणायचे कार्यक्रम सुरू झाला असून येत्या काही दिवसात मतदार राजाला असेच काही किस्से ऐकण्याची संधी मिळणार आहे.