Crime : अंगणवाडी सेविकेच्या हत्येचं गूढ उकललं, पोलिसांनी त्या एका गोष्टीवरून लावला छडा

चिचोंडी पाटील येथे अंगणवाडी सेविका बेपत्ता झाल्यानंतर गूढ उकलले आहे. अंगणवाडीत त्यांची हत्या करून मृतदेह जवळच्या नदीत टाकला. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास लावला असून आरोपीला अटक केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Crime : अंगणवाडी सेविकेच्या हत्येचं गूढ उकललं, पोलिसांनी त्या एका गोष्टीवरून लावला छडा

नगर : चिचोंडी पाटील येथील अंगणवाडी सेविकेच्या बेपत्ता होण्यामागील गूढ उकललेले आहे. त्यांचा अंगणवाडीतच खून करण्यात आला असून मृतदेह नदीत फेकून दिल्याचे आढळून आले आहे. अंगणवाडीत जाणाऱ्या मुलीला मिळणारा पोषण आहार आणण्यासाठी गेलेल्या पालकाची अंगवाडीसेविकेला एकटी पाहून नियत फि रली. त्याने त्यांच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिकार करताच त्यांचा भिंतीवर डोके आपटून खून केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुभाष बंडू बर्डे (वय २५, रा. कुक्कडवेढे, ता. राहुरी हल्ली रा. चिचोंडी पाटील, ता. अहिल्यानगर) याला अटक केली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गावात बंद पाळण्यात आला.

महेश विठ्ठल पवार (वय ४०, रा.चिचोंडी पाटील) यांच्या पत्नी चिंचोंडी पाटील गावात अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात. २४ ऑक्टोबरला त्या घरी आल्या नाहीत. त्यामुळे शोधाशोध सुरू झाली. गावात अंगणावाडीत जाऊन पाहिले असता तेथे कुलूप होते. ग्रामस्थांच्या मदतीने कुलूप तोडण्यात आले. आतमध्ये रक्ताचे डाग, कपडे, केस पडलेले होते. त्यानंतर पोलिसांना बोलाविण्यात आले. पवार यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक कार्यरत करण्यात आले. या पथकाने घटनास्थळावरील तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी नामे सुभाष बंडू बर्डे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची माहिती दिली. त्याची मुलगी या अंगणवाडीत शिकते. त्याला अंगणवाडी सेविकाचा फोन आला होता. मुलीचा पोषण आहार अंगणवाडीतून घेऊन जा, असा निरोप आला. त्यानुसार तो पोषण आहार आणण्यासाठी तेथे गेला होता. अंगणवाडी सेविकेला एकटे पाहून त्याने त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी विरोध केला. त्यामुळे झटापट झाली. आरोपीने त्यांचे डोके भिंतीवर आपटले. त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रात्री आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह अंगणवाडी शेजारील नदीत फेकून दिला.

पोलिसांना आरोपीला अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार बबन मखरे, फुरकान शेख, शरद बुधवंत, सोमनाथ झांबरे, संतोष खैरे, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड, अमोल कोतकर, चंद्रकात कुसळकर तसेच विजय ठोंबरे, हदय घोडके, मेघराज कोल्हे यांच्या पथकाने काही तासांतच गुन्हा उघडकीस आणून आरोपीला अटक केली.

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

Nagar anganwadi workerNagar Crimenagar newsअंगणवाडी सेविका हत्याअंगणवाडी सेविका हत्या प्रकरणनगरनगर बातम्या
Comments (0)
Add Comment