Kamaltai Vyavahare Resigns From Congress: पुण्यातील कसब्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. येथे ४० वर्षांनंतर एका नेत्याने काँग्रेसची साथ सोडली आहे. काँग्रेसच्या माजी महापौर कमलताई व्यवहारे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
कमलताई व्यवाहारे यांनी आज सर्व प्रथम कसबा गणपतीचं दर्शन घेतलं, त्यानंतर पत्रकारांसोबत संवाद साधला. या प्रसंगी त्यांनी काँग्रेस वरिष्ठांबाबत नाराजी व्यक्त केली. कमलताई व्यवहारे गेल्या ४० वर्षांपासून काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय राहून काम करत आहेत. त्यांनी पाच टर्म नगरसेवक म्हणून काम केलं, तर एकदा त्यांनी महापौर म्हणूनही काम पाहिलं आहे.
कमलताई व्यवहारे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. त्या म्हणाल्या की, मी माझा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना अतिशय वेदना होत आहेत. गेले ४० वर्ष पक्षाच अविरतपणे काम केलं. २००९, २००१४, २०१९ आणि आता २०२४ दरम्यान मी या जागेसाठी मागणी करत होते. पण पक्षाने मला संधी दिली नाही आणि माझा साधा विचारही केला नाही. मग पक्षासोबत का राहावं अशी भावना कार्यकर्त्यांची होती. म्हणून आज आखेर मी पक्ष सोडायचा निर्णय घेत आहे. कमलताई व्यवहारे उद्या विधानसभेसाठी उमेदवादी अर्ज दाखल करणार आहे.
Kamaltai Vyavahare: पुण्यात काँग्रेसला झटका, माजी महापौरांचा ४० वर्षांनंतर रामराम, पक्षश्रेष्ठींना अनेक फोन, पण..
पुढे कमलताई व्यवहारे म्हणाल्या की, पाच वर्षात सात वर्ष पक्ष फिरून येणाऱ्या नेता जर पक्षाचा ताबा घेत असेल आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला त्यांच्या ध्येय धोरणाला मानत नसतील. पक्षा पेक्षा आम्ही श्रेष्ठ असं जर कोण मनात असेल आणि पक्ष वरिष्ठ जर त्यांना संधी देत असेल, तर पक्ष नेतृत्व खूप मोठी चूक करत आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या.