संजय राऊतांना मोठा दिलासा! १५ दिवसांची कोठडी स्थगित; मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात जामीन मंजूर

Sanjay Raut Bail: ‘मीरा-भाईंदर शहरात सार्वजनिक शौचालयांची उभारणी व देखभाल करण्याच्या प्रकल्पात शंभर कोटी रुपयांचा घोटाळा झाला आणि त्यात किरीट व मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठान संस्थेचा सहभाग आहे’, असा जाहीर आरोप राऊत यांनी केला होता.

महाराष्ट्र टाइम्स
raut new

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांची मानहानी केल्याबद्दल दोषी ठरून १५ दिवसांची शिक्षा झालेले राज्यसभा खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांना शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला. सत्र न्यायालयाने त्यांची शिक्षा स्थगित ठेवतानाच त्यांना ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर जामीनही मंजूर केला.

‘मीरा-भाइंदर शहरात सार्वजनिक शौचालयांची उभारणी व देखभाल करण्याच्या प्रकल्पात शंभर कोटी रुपयांचा घोटाळा झाला आणि त्यात किरीट व मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठान संस्थेचा सहभाग आहे’, असा जाहीर आरोप राऊत यांनी केला होता. त्यामुळे मेधा यांनी अॅड. विवेकानंद गुप्ता यांच्यामार्फत भारतीय दंड विधानाच्या कलम ५०० अन्वये राऊत यांच्याविरोधात बदनामीचा खटला भरला होता. त्या खटल्याच्या सुनावणीअंती २६ सप्टेंबर रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या न्यायाधीश आरती कुलकर्णी यांनी राऊत यांना दोषी ठरवले. तसेच त्यांना १५ दिवसांचा साधा कारावास व २५ हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा ठोठावली. मात्र, त्यांना अपिल करता यावे म्हणून ती शिक्षा न्यायाधीशांनी ३० दिवसांसाठी स्थगित ठेवली होती. त्यानंतर राऊत यांनी त्या शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज दाखल केला. या अर्जावर शुक्रवारी न्यायाधीश संजीव पिंगळे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी संजय राऊत न्यायालयात उपस्थित होते.
Chhagan Bhujbal: सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखाच; भुजबळांकडून थेट अजित पवारांचे उदाहरण
‘राऊत यांच्या जामीन अर्जाला आमची हरकत नाही. मात्र, अपिल सुनावणीसाठी दाखल केले जाईपर्यंत जामीन मंजूर करू नये’, असे म्हणणे मेधा यांच्या वकिलांनी मांडले. तर अर्ज अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घ्यावा आणि शिक्षा स्थगित करून जामीन मंजूर करावा, अशी विनंती राऊत यांच्या वकिलांनी केली. त्यानंतर न्यायाधीशांनी राऊत यांचा अर्ज सुनावणीसाठी दाखल करून घेत तो अंतिम सुनावणीसाठी ३१ जानेवारी २०२५ रोजी ठेवला आणि जामीन मंजूर केला.

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Kirit Somaiyamedha somaiya caseMedha Somaiya defamation casesanjay raut bail grantedshiv sena ubtमुंबई बातम्यासंजय राऊत बातम्या
Comments (0)
Add Comment