कदम ‘कदम’ बढाये जा! योगेश कदमांची स्थावर मालमत्ता ३९ कोटींनी वाढली, पाच वर्षांत घसघशीत वाढ

Yogesh Kadam Wealth Increased : योगेश कदम यांच्या जंगम मालमत्तेत ४ कोटी ६३ लाख, स्थावर मालमत्तेत ३९ कोटी ३१ लाख रुपयांची वाढ झाल्याचे दिसत आहे

Yogesh Kadam Net Worth : कदम ‘कदम’ बढाये जा! योगेश कदमांची स्थावर मालमत्ता ३९ कोटींनी वाढली, पाच वर्षांत घसघशीत वाढ

प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणातील काही प्रमुख लढतींमध्ये शिवसेनेचे नेते, माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली खेड मंडळ विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ते महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. योगेश कदम यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या मालमत्तेची गुंतवणुकीची माहिती दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या कार्यालयात दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबत त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे. पाच वर्षांमध्ये आ. योगेश कदम यांच्या जंगम मालमत्तेत ४ कोटी ६३ लाख, स्थावर मालमत्तेत ३९ कोटी ३१ लाख रुपयांची वाढ झाल्याचे दिसत आहे पण याच वेळी कर्जातही ११ कोटी ५२ लाख रुपयांची वाढ झाली आहे.

योगेश कदमांची जंगम संपत्ती किती?

योगेश कदम यांच्या मालकीची ७ कोटी रुपयांची तर त्यांच्या पत्नीच्या नावे ६ कोटी ६० लाख ९९ हजार रुपये, मुलांच्या नावे ३९ लाख ७० हजार ६६ रुपये किमतीची जंगम मालमत्ता आहे. जंगम मालमत्तेत रोख रुपये ८ लाख ९९ हजार, बँकेमधील गुंतवणूक व शेअर्समधील गुंतवणूक ३ कोटी ६९ लाख ८१९ रुपये असून ३३ लाख ५० हजार रुपये किमतीची वाहने आहेत. १ कोटी ४३ लाख ५४ हजार रुपये इतके सोन्याचे दागिने आहेत. कुटुंबाची एकत्रित जंगम मालमत्ता १४ कोटी १ लाख ५ हजार ४२१ इतकी आहे.
Aaditya Thackeray Net Worth : 4.2 लाखांची BMW कार, 1.9 कोटींचे दागिने, खालापूरची जमीन; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?

स्थावर मालमत्ता किती?

योगेश कदम यांच्या नावे शेतजमीन, बिगरशेतजमीन, व्यावसायिक व निवासी अश्या स्थावर मालमत्तेची एकूण किंमत ४१ कोटी ९८ लाख २८ हजार इतकी आहे. कदम व त्यांच्या कुटुंबियांनी १५ कोटी ७० लाख ३३ हजार इतक्या रक्कमेचे कर्ज घेतले आहे. योगेश कदम यांनी २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात दाखल केलेल्या आयकर विवरण पत्रात ८३ लाख ९६ हजार २६० इतके उत्पन्न दाखविले असून त्यांच्या पत्नीचे उत्पन्न १८ लाख ७९ हजार ३८० इतके आहे.
Manoj Jamsutkar : भायखळ्याचा तिढा सुटला! जागा ठाकरेंना, उमेदवार मूळ काँग्रेसचा; यामिनी जाधवांना दोनदा पडलेला भारी
योगेश कदम यांनी शेती, सल्लागार आणि भूविकासक असे व्यवसाय करत असून पत्नी सिनेमा निर्माता असल्याची माहिती या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. योगेश कदम हे तामिळनाडू राज्यातील अलगप्पा विद्यापीठाचे पदवीधर असून त्यांनी २०१७ मध्ये बी.कॉम ही पदवी मिळवली असल्याचेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Dapoli Khed AssemblyMaharashtra politicsRatnagiri newsVidhan Sabha NivadnukYogesh Kadam Net Worthदापोली खेड विधानसभायोगेश कदमयोगेश कदम संपत्ती ३९ कोटी वाढरामदास कदम
Comments (0)
Add Comment