वसंतरावांचं वक्तव्य चुकीचंच, पण सुजयही मेलेल्या आईचं दूध प्यायलेला नाही, शालिनी विखे आक्रमक

Shalini Vikhe on Jayashree Thorat : वसंतराव देशमुख यांच्या चुकीच्या वक्तव्याचा आपण निषेध केलेलाच आहे. पण सुजय विखे मेलेल्या आईचं दूध पिलेला नाही जशेस तसे उत्तर देईल, असं शालिनीताई म्हणाल्या.

Shalini Vikhe : वसंतरावांचं वक्तव्य चुकीचंच, पण सुजयही मेलेल्या आईचं दूध प्यायलेला नाही, शालिनी विखे आक्रमक

मोबिन खान, शिर्डी : भाजप नेते सुजय विखे यांच्या मंचावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याविषयी वसंतराव देशमुख यांनी खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या टीकेचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत. अशातच सुजय यांच्या मातोश्री आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. वसंतराव देशमुख यांच्या चुकीच्या वक्तव्याचा आपण निषेध केलेलाच आहे. पण सुजय विखे मेलेल्या आईचं दूध पिलेला नाही जशेस तसे उत्तर देईल, असं शालिनीताई म्हणाल्या.

शालिनी विखे काय म्हणाल्या?

चांगलं काम काही लोकांना बघवत नाही. त्यामुळे विघ्न आणण्याचे काम ठराविक मंडळी करत आहेत. वसंतराव देशमुख यांच्या चुकीच्या वक्तव्याचा आपण निषेध केलेलाच आहे. खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी जे भाषण केलेले आहेत ते सुद्धा आमच्याकडे रेकॉर्ड आहे. सहनशीलतेला सुद्धा काहीतरी अंत असतो, असं शालिनी विखे म्हणाल्या.
Raj Thackeray : राज ठाकरेंनी एकदा मन वळवलं, पण दिवाळीआधी फटाका फुटलाच, बालेकिल्ल्यात नेत्याचा ‘दुखी मनसे’ राजीनामा
सुजय विखे यांची सर्व भाषणं मुद्देसूद असतात, मी आई म्हणून ऐकत असते. आपल्या मुलाच्या तोंडून एकही वाक्य चुकीचे जाऊ नये असे संस्कार आम्ही दिलेले आहेत. डोक्यावर पडला म्हणून आरोप करतात, परंतु कोणी ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नसतं. आपण भाषण करताना काय तारतम्य बाळगलेलं आहे याचा विचार सुद्धा केला पाहिजे. ते जर खालच्या पातळीवर बोलत असतील तर सुजय विखे मेलेल्या आईचं दूध प्यायलेला नाही, जशास तसं उत्तर देईल. आपण कुणीही बांगड्या भरलेल्या नाही. ठोशास ठोशा देण्याचं कर्तव्य आपलं आहे, असंही शालिनी विखे म्हणाल्या.
Jayashree Thorat: किती गलिच्छ बोलता? वयाला शोभतं का? माझ्या आजोबांनी आधीही खडकावलेलं, जयश्री थोरात भडकल्या
खालच्या पातळीवर आपण कोणीही जाता कामा नये. वसंतराव देशमुख यांच्याकडून गेलेल्या चुकीच्या शब्दाचा सर्व शिर्डी मतदारसंघातर्फे सुजयने निषेध केलेला आहे. न्यायाधीश या प्रकरणात न्याय देतीलच परंतु इथून पुढे लोणी गावात कोणी वाईट करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना आम्ही सोडणार नाही, अशी आक्रमक प्रतिक्रिया सुजय विखेंच्या मातोश्री शालिनीताई विखे पाटील यांनी दिली आहे.

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Balasaheb Thoratjayashree thoratShalini Vikhesujay vikheVasantrao Deshmukhजयश्री थोरातबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यबाळासाहेब थोरात मुलगीवसंतराव चव्हाण जयश्री थोरातशालिनी विखे जयश्री थोरातसुजय विखे आई
Comments (0)
Add Comment