Pune International Airport: पुण्याचा पस्तीस शहरांशी हवाई ‘कनेक्ट’; हिवाळी हंगामाला रविवारपासून सुरु

Pune International Airport : विमानतळावरील अत्याधुनिक पायाभूत सुविधांमुळे पुणे विमानतळ देशाच्या पश्चिम भागातील उदयोन्मुख कार्गो हब म्हणून विकसित होत आहे, अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.

महाराष्ट्र टाइम्स
pune airport2 AI

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा हिवाळी हंगाम उद्या, रविवारपासून (२७ ऑक्टोबर) सुरू होत आहे. या हंगामात पुण्यातून आंतरराष्ट्रीय सेवेबरोबरच देशांतर्गत काही शहरांसाठी सेवा सुरू होणार आहे. उड्डाणांची संख्येत वाढ होणार असल्याने पुणे हवाईमार्गाने ३५ शहरांशी जोडले जाणार आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज १९० पेक्षा अधिक विमानांची ये-जा होते. त्याद्वारे साधारणतः तीस हजार ते ३२ हजार प्रवासी प्रवास करतात. उन्हाळी हंगामात विमानतळावरून दिवसभरात १०० उड्डाणे झाली होती. रविवार ते सोमवारदरम्यान विमानतळाला विमानांचे ‘स्लॉट’ तुलनेने जास्त असतात. शनिवारी ‘स्लॉट’ ची संख्या कमी असते. पुणे हे लष्करी विमानतळ असल्यामुळे सकाळी नऊ ते साडेअकरा दरम्यान वाहतूक बंद असते. त्यामुळे दिवसा ‘स्लॉट’ची संख्या कमी असते. रात्री प्रवासी वाहतुकीसाठी ‘स्लॉट’ तुलनेने अधिक असतात. त्यामुळे पुण्यातून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांची संख्या रात्री जास्त असते.
Chhagan Bhujbal: सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखाच; भुजबळांकडून थेट अजित पवारांचे उदाहरण
एका दिवसात १०० मालवाहतूक
भारतीय विमानतळ प्राधिकरणाची उपकंपनी असलेल्या ‘एएआय कार्गो लॉजिस्टिक अँड अलाइड सर्व्हिसेस’तर्फे गुरुवारी (२४ ऑक्टोबर) एका दिवसात १०० टन मालवाहतूक केली. पुण्यातील मॅन्युफॅक्चरिंग आणि औषध उद्योगांकडून पाठविण्यात येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील मालामुळे ‘कार्गो’ वाहतुकीत वाढ होत आहे. विमानतळावरील अत्याधुनिक पायाभूत सुविधांमुळे पुणे विमानतळ देशाच्या पश्चिम भागातील उदयोन्मुख कार्गो हब म्हणून विकसित होत आहे, अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपींनी सांगितलं धक्कादायक कारण, भाईसाठी केलं…
बँकॉकसाठी थेट सेवा सुरू होणार हिवाळी हंगामात बँकॉकसाठी नव्याने विमानसेवा सुरू होणार आहे. याशिवाय भोपाळ, तिरुअनंतपुरम या शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू होत आहे. चेन्नई, इंदूर, अहमदाबाद, आणि डेहराडून या शहरांसाठी यापूर्वीच अतिरिक्त उड्डाणे सुरू झाली आहेत. याच हंगामात ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’तर्फे चेन्नई, कोचीसाठी थेट उड्डाण सुरू करण्यात येणार आहे. पुण्यातून सिंगापूर, दुबई आणि बैंकॉक या तीन शहरांसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे हिवाळी हंगामात पुण्यातील उड्डाणांची संख्या वाढणार आहे.

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

AAI Cargo Logistics and Allied Servicescargo flightpune international airportpune international airport timetablepune international airport winter seasonpune news todayपुणे बातम्यापुणे लष्करी विमानतळभारतीय विमानतळ प्राधिकरण नोकरी
Comments (0)
Add Comment