साप्ताहिक अंकशास्त्र, 28 ऑक्टोबर To 3 नोव्हेंबर 2024 : मूलांक 2 खर्चात वाढ, समस्या संवादाने सोडवा ! मूलांक 9 नवे प्रोजेक्ट मिळणार ! मूलांक 1 ते 9 साठी अंकशास्त्रानुसार जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

Weekly Numerology Prediction 28 Oct To 3 Nov 2024 : मूलांक 1 साठी हा आठवडा प्रोजेक्टमध्ये भरघोस यश आहे. तर मूलांक 2 साठी खर्च वाढणार आहे. मूलांक 4 च्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत काळ अनुकूल असून मूलांक 6 ची कामे मार्गी लागणार असून प्रोजेक्ट पूर्ण होतील. मूलांक 8 ने बॅकअप प्लॅन तयार ठेवा म्हणजे आयत्यावेळी धावपळ होणार नाही. मूलांक 9 साठी आठवडा उत्तम असून नवे प्रोजेक्ट मिळणार आहेत. तुमचा मूलाकं काय सांगतो? मूलांक 1 ते मूलांक 9 साठी आठवडा कसा असेल ते पाहूया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
साप्ताहिक अंकशास्त्र, 28 ऑक्टोबर To 3 नोव्हेंबर 2024 : मूलांक 2 खर्चात वाढ, समस्या संवादाने सोडवा ! मूलांक 9 नवे प्रोजेक्ट मिळणार ! मूलांक 1 ते 9 साठी अंकशास्त्रानुसार जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

Weekly Numerology 28 Oct To 3 Nov 2024: ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळी आहे तसेच लक्ष्मी नारायण राजयोग तयार होतो आहे. त्याचा शुभ प्रभाव सगळ्या मूलांकांवर असेल. धनसंपत्ती वाढ, नोकरी-व्यवसायात प्रगती असेल. अंक ज्योतिषानुसार मूलांक 1 सह या मूलांकांसाठी आठवडा उत्तम असून धनलाभाचे योग, ताणतणाव कमी असेल. मूलांक 3 सह या मूलांकासाठी ऑफिस आणि व्यवसायातील चढउतार कमी होतील. खूप मेहनत आणि फोकस करून काम करावे लागेल पण चांगला लाभ होईल. चला तर जाणून घेऊ मूलांक 1 ते मूलांक 9 पैकी कोणत्या मूलांकाचे लोक या आठवड्यात भाग्यशाली ठरतील.

मूलांक 1 (जन्म तारीख १, १०, १९, २८): प्रोजेक्टमध्ये भरघोस यश

हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम असून व्यवसाय आणि नोकरीमधील प्रोजेक्टमध्ये भरघोस यश मिळणार आहे. तुम्ही एकदम रिलॅक्स फिल करणार आहात. आर्थिक बाबतीत आठवडा शुभ असून धनलाभाचे योग आहेत. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा योग आहे. आठवड्याच्या शेवटी सुख समाधानाचे योग आहे. तुमचे सगळे निर्णय सफल होणार आहेत.

मूलांक 2 (जन्म तारीख २, ११, २०, २९): खर्च वाढणार, समस्या संवादाने सोडवा

हा आठवडा तुमच्यासाठी ठिक आहे. लव्ह लाइफ उत्तम असून कुटुंबासोबत वेळ चांगला व्यतीत होणार आहे. ऑफिस किंवा व्यवसायात अशी काही बातमी मिळेल ज्यामुळे मन दुःखी होईल, तेव्हा सतर्क राहा. आर्थिक बाबतीत वेळ ठिक नाही, तुमचा खर्च वाढणार आहे. कुठे ही समस्या असेल तर संवादाने अधिक चांगल्याप्रकारे सोडवली जाते हे लक्षात ठेवा.

मूलांक 3 (जन्म तारीख ३, १२, २१, ३०): ऑफिसच्या कामात प्रगती

हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम आहे. ऑफिसच्या कामात प्रगती आहे. वरिष्ठ तुमच्यावर खुष आहेत त्यामुळे काही नवीन प्रोजेक्ट मिळणार आहेत. आर्थिक लाभ चांगला आहे. लवलाइफमध्ये एकाकीपणाची जाणीव होईल. कोणासोबत वाद असेल तर संवाद साधून त्यावर तोडगा काढा अन्यथा वाद वाढत जाईल.

मूलांक 4 (जन्म तारीख ४, १३, २२, ३१): आर्थिक बाबतीत काळ अनुकूल

हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असून आर्थिक बाबतीत काळ अनुकूल आहे. धन प्राप्तीमुळे बँक बॅलन्स वाढलेला आहे. लवलाइफ चांगले आहे. कार्यक्षेत्रात काही अडचणी येऊ शकतात पण तुम्ही त्यातून मार्ग काढणार. आठवड्याच्या शेवटी एकांतात वेळ घालवायला आवडेल. तुम्ही जे काही निर्णय घेतले होते त्याचा चांगला परिणाम पहायला मिळणार आहे.

मूलांक 5 (जन्म तारीख ५, १४, २३): धन लाभासह सुख-समृद्धीचे योग

हा आठवडा तुमच्यासाठी शुभ असून धनलाभाचे योग आहेत तसेच बँक बॅलन्स वाढणार आहे. गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ होणार असून सुख आणि समृद्धीचे योग आहेत. प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, तुम्हाला यश मिळेल. व्यवसाय उत्तम आहे तुम्हाला काही बदल करायचे असतील तर करु शकता. लवलाइफ चांगली आहे. आठवड्याच्या शेवटी मानसिक ताणतणाव कमी असेल.

मूलांक 6 (जन्म तारीख ६, १५, २४): कामे मार्गी लागणार, प्रोजेक्ट पूर्ण होणार

हा आठवडा चांगला आहे, व्यवसाय आणि नोकरीत कामे मार्गी लागणार आहेत. प्रोजेक्ट पूर्ण होणार असून तुम्ही यशाच्या मार्गावर आहात. लव लाइफमध्ये समतोल ठेवा, चांगले परिणाम मिळतील. आर्थिक स्थिती ठिक आहे पण खर्च करावा की करू नये अशी द्विधा मनस्थिती निर्माण होवू शकते. आठवड्याच्या शेवटी प्रगती करण्याचे योग आहेत त्याचा लाभ घ्या.

मूलांक 7 (जन्म तारीख ७, १६, २५): ताणतणाव वाढण्याची शक्यता

हा आठवडा ठिक आहे आणि ऑफिसच्या कामात प्रगती असून प्रोजेक्ट यशस्वी होतील. या आठवडयात काही कारणामुळे तुम्हाला ताणतणाव जाणवे. आर्थिक बाबतीत भविष्याच्या दृष्टीने विचार करा तसेच गुंतवणुकिकडे लक्ष द्या. लवलाइफमध्ये मोकळा संवाद राहू दे तरच नाते अधिक दृढ होईल. आठवड्याच्या शेवटी मेहनतीने तुम्ही समस्यांवर मात करणार असून पुढे जाणार आहात. तुम्हाला सुख समाधान मिळेल.

मूलांक 8 (जन्म तारीख ८, १७, २६): बॅकअप प्लॅन तयार ठेवा

हा आठवडा आर्थिक बाबतीत शुभ आहे. नवीन गुंतवणुकीचा विचार करणार आहात त्यामुळे तुम्हाला लाभ होईल. लवलाइफ चांगली आहे. ऑफिसच्या कामात बॅकअप प्लॅन तयार ठेवा, आयत्यावेळी धावपळ होणार नाही. व्यवसायात कागदपत्रांची नीट तापसणी करा. विरोधक त्रास देणार नाहीत. आठवड्याच्या शेवटी सुखसमृद्धीचे योग आहेत.

मूलांक 9 (जन्म तारीख ९, १८, २७): नवे प्रोजेक्ट मिळणार

हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम असून तुमची कामात प्रगती होणार आहे. तुम्हाला नवे प्रोजेक्ट मिळणार आहेत, त्यात मेहनत फार असेल पण लाभ मोठा आहे. आर्थिक बाबतीतही काळ अनुकूल असून धन लाभाचे योग आहेत. लवलाइफमध्ये अहंकारामुळे वादाची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी संवादाने समस्यांचे निराकरण करा तुम्हाला रिलॅक्स वाटेल.

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

कसा असेल माझा आठवडा?घरी भांडण होणार?नोकरी मिळणार का?व्यवसायात नफा होईल?
Comments (0)
Add Comment