Pune Khadakwasla Assembly Constituency : यंदा पुण्यातील खडकवासला मतदारसंघात मनसेने उमेदवार दिल्याने तिथे तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात शरद पवारांनी आपल्या हुकमी एक्क्याला संधी दिली आहे. मागील निवडणुकीला या उमेदवाराचा अवघ्या २५०० मतांनी पराभव झाला होता. कशी असणार तिरंगी लढत जाणून घ्या.
महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाकडून सचिन दोडके यांना तिकिट देण्यात आलं आहे. तर भाजपने पुन्हा एकदा विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना उमेदवारी दिली आहे. तर याआधी मनसेने दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे यांचे सुपुत्र मयुरेश वांजळे यांना उमेदवारी दिली होती. गेल्या अनेक दिवसांपासून खडकवासला मतदारसंघामध्ये मोठा सस्पेन्स पाहायला मिळत होता. विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांची उमेदवारी गॅसवर असल्याचं पाहायला मिळालं होतं. कारण खडकवासला आणि वडगाव शेरी हे मतदासंघ भाजप आणि अजित पवार गट अदलाबदल करून घेणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र दादांनी पुन्हा सुनील टिंगरे यांना उमेदवारी देत या चर्चांणा पूर्णविराम दिला.
आता खडकवासला मतदासंघाध्ये तिरंगी लढत होणार आहे. या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलेलं असणार आहेय. २०१९ च्या निवडणुकीमध्ये भीमराव तापकीर आणि सचिन दोडके हे उमेदवार रिंगणात उतरले होते. या मतदारसंघात एकदम काँटे की टक्कर पाहायला मिळाली होती. राष्ट्रवादीकडून उभे असलेल्या सचिन दोडके यांचा या निवडणुकीमध्ये अवघ्या २५९५ मतांनी पराभव झाला होता. आता शरद पवार गटाकडून सचिन दोडके यांनी पुन्हा एकदा उमेदवारी दिली गेली आहे. त्यासोबतच मनसेकडून मुयुरेश वांजळे यंदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या तिरंगी लढतीमध्य जनता कोणाला गुलाल उधळण्याची संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.