राजापूर मतदारसंघात तिरंगी लढतीचे संकेत! काँग्रेस नेत्याच्या स्वतंत्र भूमिकेनंतर ठाकरेंच्या शिलेदारासमोर दुहेरी आव्हान

Rajapur Vidhan Sabha Politics: राजापूर मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत या नव्या भिडूसोबत साळवींचा सामना रंगणार आहे. यातच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनीही याच मतदारसंघात अपक्ष उमेदवारी भरून महाविकास आघाडीतील नाराजीला वाचा फोडली आहे. आता कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीतून माघार नाही, असा पवित्राच अविनाश लाड यांनी घेतला आहे.

Lipi

प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघ हा चर्चेत आला असून याठिकाणी उद्धव ठाकरे यांचे शिलेदार आमदार राजन साळवी यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत या नव्या भिडूसोबत साळवींचा सामना रंगणार आहे. यातच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनीही याच मतदारसंघात अपक्ष उमेदवारी भरून महाविकास आघाडीतील नाराजीला वाचा फोडली आहे. आता कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीतून माघार नाही, असा पवित्राच अविनाश लाड यांनी घेतला आहे. त्यामुळे विद्यमान आमदार राजन साळवी यांच्यासमोर यंदा दुहेरी आव्हान असणार आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार साळवी यांच्याविरोधात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचा निसटता पराभव झाला होता. काँग्रेसचे उमेदवार अविनाश लाड यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून ५३ हजार ५५७ तर आमदार राजन साळवी यांना ६५ हजार ४३३ इतकी मते मिळाली होती. राजन साळवी यांनी ११ हजार ८७६ मतांनी आघाडी घेत अविनाश लाड यांना पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीतील ही आकडेवारी पाहता राजन साळवी यांच्यासमोर पुन्हा एकदा अविनाश लाड यांचे तगडे आव्हान असणार आहे. तर महायुतीकडूनही किरण सामंत रिंगणात आहेत. अशा दुहेरी परीक्षेला साळवींना सामोरे जावे लागणर आहे.
BJP Second List: भाजपची दुसरी यादी जाहीर, २२ उमेदवारांच्या नावाची घोषणा; पाहा कोणाला संधी मिळाली
लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला सुटावी यासाठी अविनाश लाड यांनी आग्रह धरला होता. इतकेच नाहीतर ठाकरे गटाचे शिलेदार विद्यमान आमदार राजन साळवी यांच्याविरोधात त्यांनी अनेकदा उघडपणे भूमिका घेतली होती. रिफायनरी प्रकल्प व अणुऊर्जा प्रकल्प या प्रकल्पांच्या संदर्भात स्थानिक आमदार राजन साळवी यांच्या भूमिकेवर अविनाश लाड यांनी यापूर्वी अनेकदा आक्षेप घेतला होता.

आता या सगळ्याचे पडसाद थेट विधानसभा निवडणुकीत उमटताना पाहायला मिळणार आहेत. गुरुवारी अविनाश लाड यांनी अपक्ष फॉर्म भरताना आपल्याला काँग्रेस पक्ष २९ ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एबी फॉर्म देणार, असा विश्वास व्यक्त केला होता. तर आपण आता निवडणुकीतून कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. हा स्थानिक भूमिपुत्रांचा लढा आहे आणि मी भूमिपुत्र आहे असेही लाड म्हणाले आहेत. त्यामुळे आता ठाकरे गटाचे उमेदवार विद्यमान आमदार राजन साळवी यांना महाविकास आघाडीतील नाराजीला तोंड द्यावे लागण्याची चित्र आहे. आता या सर्व परिस्थितीवर महाविकास आघाडीचे नेते काय तोडगा काढणार, हे पाहणेही तितेच महत्त्वाचे ठरणार आहे.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

congress leader avinash Jadhavmh vidhan sabha nivadnukrajan salvirajapur vidhan sabha politicsshivsena ubtअविनाश लाडांची स्वतंत्र भूमिकामहाराष्ट्र विधानसभा निवडणूकराजन साळवींसमोर आव्हानराजापूर विधानसभेचा रणसंग्रामशिवसेना ठाकरे गटाची ताकद
Comments (0)
Add Comment