Today Panchang 27 October 2024 in Marathi: रविवार २७ ॲाक्टोबर २०२४, भारतीय सौर ५ कार्तिक शके १९४६, आश्विन कृष्ण एकादशी अहोरात्र, चंद्रनक्षत्र: मघा दुपारी १२-२२ पर्यंत, चंद्रराशी: सिंह, सूर्यनक्षत्र: स्वाती
मघा नक्षत्र दुपारी १२ वाजून २४ मिनिटांपर्यंत त्यानंतर पूर्वाफाल्गुनी नक्षत्र प्रारंभ, ब्रह्म योग सुर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ४७ मिनिटांपर्यंत, त्यानंतर ऐन्द्र योग प्रारंभ, बालव करण सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतील करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र सिंह राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-३८
- सूर्यास्त : सायं. ६-०७
- चंद्रोदय: उत्तररात्री ३-०८
- चंद्रास्त: दुपारी ३-१४
- पूर्ण भरती: सकाळी ८-५२ पाण्याची उंची ३.६१ मीटर, रात्री ९-४२ पाण्याची उंची ३.३१ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे २-२३ पाण्याची उंची १.९१ मीटर, दुपारी ३-२० पाण्याची उंची १.७१ मीटर
- सण आणि व्रत : कौमुदी महोत्सव प्रारंभ, ब्रह्म योग
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४७ मिनिटांपासून ते ५ वाजून ३८ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५६ मिनिटांपासून ते २ वाजून ४१ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ३९ मिनिटांपासून ते १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ४० मिनिटांपासून ते ६ वाजून ५ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ९ वाजून १७ मिनिटांपासून ते १० वाजून ४१ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ संध्याकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ संध्याकाळी ४ वाजून १० मिनिटांपासून ते ४ वाजून ५५ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
सुर्याला अर्घ्य द्या तसेच लाल रंगाचे फुल अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त)