Maharashtra Election 2024 : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कणकवली मतदारसंघाचे उमेदवार संदेश पारकर यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राणे यांच्यामुळे भाजपची वाढ खुंटली असा आरोप पारकर यांनी केला.
संदेश परकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज पारकर यांनी राणेंवर जोरदार निशाणा साधला आहे. नितेश राणे स्वतःच्या भावाला आपल्या पक्षात न्याय देवू शकले नाहीत,ते कार्यकर्त्यांचे प्रवेश घेवून काय करणार? त्यांनी आत्मपरीक्षण करावे? आपला भाऊ भाजप सोडून का गेला? याचे आत्मचिंतन नितेश राणे यांनी करावे असे वक्तव्य संदेश परकर यांनी केले आहे. नितेश राणे यांना आपला पराभव त्यांच्या डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे असे अनेक प्रवेश केले जात आहेत. नारायण राणे भाजपमध्ये आल्यामुळे मूळ भाजपची वाढ खुंटली आहे.
नारायण राणे हे गेले ३५ वर्ष मंत्री आहेत, मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री तसेच उद्योग मंत्री देखील झाले, मात्र या जिल्ह्यामध्ये कोणताही उद्योग आणले नाहीत. फक्त राणेंना सत्ता पाहिजे. आपल्या घरातच आमदार,खासदार झाले पाहिजे, असा आरोप संदेश पारकर यांनी केलाय. यावेळी विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होती.
कणकवली विधानसभेची मला उमेदवारी दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांचे आभार मानत आहे. या जबाबदारीसाठी मला योग्य ठरवले त्याबद्दल धन्यवाद, आपण टाकलेला विश्वास हा नक्कीच सार्थकी ठरवेल असे पारकर यांनी सांगितले. या मतदारसंघांमध्ये 21000 पेक्षा जास्त मताधिक्याने माझा विजय होईल, असा विश्वास पारकर यांनी दिलाआहे.
जिल्ह्यातील ,शिवसैनिकांना,महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो,या मतदार संघात दलित,मराठा,मुस्लिम,धनगर अनेक समाज आहेत,त्यांना आरक्षण मिळाले नाही. या मतदारसंघांमध्ये नितेश राणे यांच्याकडून मुस्लिम समाजाचा दोष निर्माण केला जात आहे. त्यामुळे होणारे या निवडणुकीमध्ये सर्व समाज घटकांना एकत्र घेऊन ही निवडणूक लढवणार असल्याचा वक्तव्य संदेश पारकर यांनी म्हटले आहे.