MNS fifth Candidate List : मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये एकूण १५ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे.
पाचव्या यादीत १५ उमेदवार, कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?
पनवेल – योगेश चिले
खामगांव – शिवशंकर लगर
अक्कलकोट – मल्लिनाथ पाटील
सोलापूर शहर मध्य – नागेश पासकंटी
जळगाव जमोद – अमित देशमुख
मेहकर – भय्यासाहेब पाटील
गंगाखेड – रुपेश देशमुख
उमरेड – शेखर दुंडे
फुलंब्री – बाळासाहेब पाथ्रीकर
परांडा – राजेंद्र गपाट
उस्मानाबाद (धाराशिव) – देवदत्त मोरे
काटोल – सागर दुधाने
बीड – सोमेश्वर कदम
श्रीवर्धन – फैझल पोपेरे
राधानगरी – युवराज येड्डरे
दरम्यान, राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांनी एका भाषणावेळी पहिल्या ७ उमेदवारांची नावं जाहीर केली होती. त्यानंतर मनसेने दुसरी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. दुसऱ्या यादीमध्ये मनसेने अमित ठाकरे यांचं नाव जाहीर केलं होतं. अमित ठाकरे हे माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवणार असण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आला होता. त्याशिवाय कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील, वरळीतून संदीप देशपांडे, ठाणे शहरमधून अविनाश जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.
त्यानंतर तिसरी १३ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. तर चौथ्या यादीमध्ये ५ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली होती. आता पाचव्या यादीत १५ जणांची नावं मनसेकडून जाहीर करण्यात आली आहेत. दरम्यान, आतापर्यंत मनसेकडून ८५ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.
MNS Candidate : राज ठाकरेंनी विधानसभेच्या रिंगणात आतापर्यंत उतरवले ८५ शिलेदार, पाचव्या यादीत पाहा कोणाला दिली संधी?
मनसेने लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यावेळी महायुती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कल्याण ग्रामीणमधून मनसे आमदार असलेल्या राजू पाटील यांनी काम केलं होतं. मात्र आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने एकला चलो रेचा नारा दिला असून राज्यभरात आपले स्वतंत्र उमेदवार दिले आहेत.