पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीच! २१पैकी ७ मतदारसंघांतील लढतीचे चित्र, कोण राखणार गड?

NCP vs NCP News: अजितदादांच्या पुणे जिल्ह्यातील वर्चस्वाला ब्रेक लावण्याचा शरद पवार यांच्याकडून डाव खेळला जात असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्र टाइम्स
ajit pawar sharad pawar1

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या २१ मतदारसंघापैकी सात मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांमध्येच निवडणूक रंगणार आहे. म्हणजेच राष्ट्रवादीमध्येच ही लढत होणार असल्याने यावरून पुणे जिल्ह्याचा गड कोण राखणार हेही ठरणार आहे. यानिमित्ताने अजितदादांच्या पुणे जिल्ह्यातील वर्चस्वाला ब्रेक लावण्याचा शरद पवार यांच्याकडून डाव खेळला जात असल्याची चर्चा आहे.

मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना पुणे जिल्ह्यावर अजित पवार यांचे वर्चस्व कायम होते. दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे, दिलीप मोहिते पाटील, अशोक पवार, अण्णा बनसोडे, चेतन तुपे यांच्या रुपाने जिल्ह्यात अजितदादांची यांचीच एकहाती सत्ता होती. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार भाजप शिंदेसेनेच्या युतीत जाऊन सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट झाले. अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या पुणे जिल्ह्याच्या गडाला सुरूंग लावण्याचा शरद पवार यांनी लोकसभेपासूनच सुरुवात केली. बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांची लढत झाली. त्यात सुनेत्रा पवार यांचा पराभव करण्यात आला.

पक्षातून बाहेर पडल्याने अजित पवार यांच्याशी अंतर्गत वैर असलेल्या नेत्यांसह आमदारांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले. शरद पवार यांना सहानुभुती मिळाल्याने खासदारांची संख्या गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक वाढली. त्यामुळे अजित पवार गटातील अनेक आमदार शरद पवार यांच्याकडे जाण्यास इच्छुक होते. अनेकांनी पवार यांची भेट घेऊन इच्छाही व्यक्त केली. मात्र, पवार यांनी पक्ष फोडून अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या विद्यमान आमदारांसाठी दारे बंद असल्याचे जाहीर केले. त्यामुळे अनेक आमदारांच्या मनात पवार यांच्या डावपेचाबाबतची भीती निर्माण झाली. त्याचाच भाग म्हणून पुणे जिल्ह्यातील २१ पैकी आतापर्यंत जाहीर झालेल्या दोन्ही राष्ट्रवादीच्या जागांपैकी सात जागांमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.
राहुल नार्वेकरांपेक्षा आशिष शेलार श्रीमंत, पाच वर्षांत संपत्तीत किती वाढ? जाणून घ्या
पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघात खुद्द पुतण्या असलेल्या अजित पवार यांच्याविरोधात त्यांचाच पुतण्या युगेंद्र पवार याला उमेदवारी देऊन शरद पवार यांनी मोठा डाव टाकला आहे. त्यामुळे बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे. शेजारी इंदापूरमध्ये लोकसभा निवडणुकीवेळी दमदाटीची भाषा केली जात असल्याचा आरोप झालेले अजितदादांचे समर्थक दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात महायुतीतून बाहेर पडलेल्या हर्षवर्धन पाटील यांना प्रवेश देऊन उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे त्या दोघांमध्ये लढत रंगतदार होण्याची चर्चा आहे.

हडपसरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पदरात पाडून घेत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात विद्यमान आमदार चेतन तुपे यांना, तर वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगरे यांना अजित पवार यांनी उमेदवारी दिली. टिंगरे विरुद्ध बापू पठारे यांना उमेदवारी मिळाल्याने दोन राष्ट्रवादीच्या गटात ही लढत होणार आहे. शिरूरमधून शरदचंद्र पवार पक्षाकडून अशोक पवार रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेच्या उबाठा गटाकडून अजित पवार गटात आलेले ज्ञानेश्वर कटके यांना त्यांच्याविरोधातउमेदवारी मिळाली.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपींनी सांगितलं धक्कादायक कारण, भाईसाठी केलं…
आंबेगाव तालुक्यात विद्यमान मंत्री दिलीप वळसे पाटील यांना उमेदवारी दिल्याने एकेकाळचे त्यांचे कार्यकर्ते असलेले देवदत्त निकम यांना शरद पवार यांनी उमेदवारी दिली. जुन्नरमधून अतुल बेनके शरद पवार यांच्या संपर्कात सातत्याने होते. त्यांना पवार यांच्या पक्षाकडून लढण्याची इच्छा असल्याची चर्चा होती. मात्र, अजित पवार यांच्या गटाने त्यांना उमेदवारी दिल्याने यांच्या विरोधात सत्यशील शेरकर यांना उमेदवारी मिळाली आहे.त्यामुळे त्या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होईल.

एकूणच, विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार यांच्या जिल्ह्यातील वर्चस्वाला सुरूंग लावण्याची शरद पवार यांनी खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या उमेदवारांचा पराभव करून पुणे जिल्ह्यात ‘अभी टायगर जिंदा है’ असा संदेश जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना देण्याचा पवार यांचा डाव असल्याचे बोलले जात आहे.

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

ajit pawarBaramati vidhan sabhadilip valase patilhadpsar vidhan sabhamaharashtra vidhan sabha nivadnuk 2024ncp vs ncpSharad PawarShirur Vidhan Sabhaपुणे बातम्याराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
Comments (0)
Add Comment