Nashik Vidhan Sabha: नाशिक मध्य मतदारसंघात भाजपकडून देवयानी फरांदे यांना उमेदवारी दिल्याने या ठिकाणी आता फरांदे विरुद्ध उबाठाचे वसंत गिते असा सामना रंगणार आहे.
प्रतिष्ठेच्या येवल्यात मंत्री छगन भुजबळांविरोधात शरद पवारांनी माणिकराव शिंदे यांना रिंगणात उतरवल्याने या ठिकाणी दुरंगी लढत रंगणार आहे. पालकमंत्री दादा भुसेंच्या मालेगाव बाह्य मतदारसंघामध्ये सद्यःस्थितीत तिरंगी लढत असेल. नरहरी झिरवाळ यांच्या दिंडोरीतही तिरंगी लढतीची शक्यता आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या १५ जागा असून, त्यापैकी महायुतीकडून १३, तर महाविकास आघाडीकडून १२ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. नाशिक मध्य मतदारसंघात भाजपकडून देवयानी फरांदे यांना उमेदवारी दिल्याने या ठिकाणी आता फरांदे विरुद्ध उबाठाचे वसंत गिते असा सामना रंगणार आहे.
नाशिक पूर्वमध्ये भाजपचे अॅड. राहुल ढिकले विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गणेश गिते अशी दुरंगी लढत होणार आहे. नाशिक पश्चिममध्ये मात्र बहुरंगी लढत होणार आहे. या ठिकाणी भाजपच्या सीमा हिरेंसमोर उबाठाचे सुधाकर बडगुजर, मनसेचे दिनकर पाटील यांच्यासह भाजपमधील बंडखोरांचे आव्हान असेल. देवळालीत आता सरोज अहिरे विरुद्ध योगेश घोलप अशी दुरंगी लढत आहे. मालेगाव बाह्यमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्यासमोर उबाठाचे अद्वय हिरे यांच्यासह अपक्ष बंडूकाका बच्छाव यांचे आव्हान असेल. नांदगावमध्ये तिरंगी, तर दिंडोरीत झिरवाळ यांच्यासमोर उबाठाच्या सुनीता चारोस्कर आणि बंडखोर धनराज महालेंचे आव्हान आहे.
जिल्ह्यात अशा आहेत लढती
नाशिक मध्य
देवयानी फरांदे (भाजप)
वसंत गिते (शिवसेना उबाठा)
डॉ. हेमलता पाटील (काँग्रेस बंडखोर)
नाशिक पूर्व
अॅड. राहुल ढिकले (भाजप)
गणेश गिते (राष्ट्रवादी शरद पवार गट)
नाशिक पश्चिम
सीमा हिरे (भाजप)
सुधाकर बडगुजर (शिवसेना उबाठा)
दिनकर पाटील (मनसे)
दशरथ पाटील (स्वराज्य)
देवळाली
सरोज अहिरे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
योगेश घोलप (शिवसेना उबाठा)
मालेगाव बाह्य
दादा भुसे (शिवसेना शिंदे गट)
अद्वय हिरे (शिवसेना उबाठा)
बंडूकाका बच्छाव (अपक्ष) सिन्नर
अॅड. माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
उदय सांगळे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
नांदगाव
सुहास कांदे (शिवसेना शिंदे गट)
गणेश धात्रक (शिवसेना उबाठा)
समीर भुजबळ (अपक्ष)
दिंडोरी
नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी अजित पवार गट)
सुनीता चारोस्कर (राष्ट्रवादी शरद पवार गट)
धनराज महाले (अपक्ष)
कळवण
नितीन पवार (राष्ट्रवादी अजित पवार गट)
जिवा पांडू गावित (माकप)
बागलाण
दिलीप बोरसे(भाजप)
दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी पवार गट)
येवला
छगन भुजबळ (राष्ट्रवादी अजित पवार गट)
माणिकराव शिंदे (राष्ट्रवादी शरद पवार गट)