Narayan Rane On Shivsena UBT: नारायण राणे यांनी कोकणात ठाकरेसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही, असं वक्तव्य करत थेट शिवसेना उबाठाला चॅलेंज दिलं आहे. तर त्यांनी वैभव नाईकांवरही सडकून टीका केली आहे.

राजन तेलीला सावंतवाडीतून हद्दपार करणार,असा निर्धार प्रत्येक महायुतीच्या कार्यकर्त्याने करायचा आहे. काँग्रेसकडे एक मत नसताना मी त्याला आमदार केलं. त्याची जाणीव राजन तेली यांना नाही. मुंबईतील आलिशान चार कोटीचं घर कोणी दिलं? याची जाणीव तेलींना नाही. राजन तेली यांना माझ्या समोर फक्त उभा राहायला सांगा. माझ्या समोर आला तर तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. असा इशाराही राणे यांनी दिला.
जमिनी घेणे त्याचप्रमाणे लोकांची फसवणूक करणे हे भाजपमध्ये येऊन काम करत होता. परशुराम उपरकर आणि राजन तेली यांची अंडी पिल्ली मला माहिती आहेत. त्यामुळे जास्त वळवळ करू नये असा सल्ला नारायण राणे यांनी दिलाय.
नुसते जाडजुड पैलवान असून चालत नाही, कुडाळ मालवण आमदार वैभव नाईक यांना टोला
२०१४ पासून वैभव नाईक कुडाळ मालवणमध्ये आमदार आहेत. दहा वर्ष कोणतेही काम या मतदारसंघांमध्ये विधायक झालेलं नाही. जर वैभव नाईक यांनी या मतदारसंघामध्ये एखादं विधायक काम केलं असेल तर ते सांगावे. धनुष्यबाण हा रामाचा आहे. त्यामुळे त्या भानगडीत कोणी पडू नये. कोल्हापूरच्या ठेकेदाराच्या नावाने कॉन्ट्रॅक्ट घेणे हे काम मात्र वैभव नाईक यांचं आहे. नुसते पैलवान असून चालत नाही तर अंगात रंग लागतो, असा खोचकटोला आमदार वैभव नाईक यांना नारायण राणे यांनी लगावला आहे
उद्धव ठाकरे हे कोणालाही उमेदवारी देऊन लग्नाला उभं करतात, मांडव घातला म्हणजे मुलगी मिळायला हवी ना, अशी परिस्थिती उद्धव ठाकरे सेनेची झालेली आहे. एकतर स्वतः आजारी पेशंट आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बोलणे मी शक्यतो टाळतो. अधू माणसावर काय बोलणार, त्यांना दीर्घायुष्य लाभो, एवढेच मी म्हणेन, अशा शब्दात राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
Narayan Rane: नुसतं जाडजुड पैलवान असून चालत नाही, वैभव नाईकांना राणेंचा टोला, सामंतासोबतच्या वादावरही स्पष्टीकरण
दरम्यान, उदय सामंत आणि आपले कधीही भांडण नव्हते. ज्यावेळी सर्वजण आमदार बाहेर पडले. त्यावेळी मी फोन करून त्याला सांगितलं, गुवाहाटीला जा, मी एकनाथ शिंदेंशी बोलतो, तू मंत्री होशील, असा सल्ला दिल्याची कबुलीही राणे यांनी दिली. उदय सामंत आणि आपले भांडण आहे अशा बातम्या विरोधक मुद्दाम पेरत असल्याच नारायण राणे यांनी म्हटले आहे.