Mumbai Vidhan Sabha Election: मुंबईतील भूलेश्वर भागातून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं. या पाच जणांकडून पोलिसांना एक बॅग सापडली. या बॅगेत पैसे असल्याचं समोर आलं आहे.
मुंबईच्या भूलेश्वर भागातून १ कोटी ३२ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. रोकड घेऊन जाणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचीही माहिती आहे. ही रक्कम कोणाची आहे, कुठून आली आणि कुठे नेली जात होती. याचा तपास सध्या पोलीस करत आहे. तसेच, ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांचीही कसून चौकशी केली जात आहे.
भूलेश्वर परिसरात ५ व्यक्ती एक बॅग घेऊन संशयितरित्या जात होते. तेव्हा पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. पोलीस तपासात त्यांच्याजवळ ही रोकड आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये पैसे असल्याचं दिसून आलं. या प्रकरणी ५ जणांसह रोकड घेऊन पोलिस आणि भरारी पथक व्हीपीरोड पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर ही रोकड तपासण्यात आली. तेव्हा या बॅगेत १ कोटी ३२ लाख रुपये असल्याचं समोर आलं.
Mumbai Money Seized: पुण्यात ५ कोटी, नागपुरातूनही रोकड जप्त; आता मुंबईत घबाड सापडलं, भुलेश्वरमधून ५ जण ताब्यात
ही रोकड नेमकी कोणाची आहे आणि ती कशासाठी वापरली जाणार होती, याचा तपास भरारी पथक करत असून आयकर अधिकाऱ्यांनाही पाचरण केलं आहे. सध्या याप्रकरणाचा तपास सुरु आहे. पण, निवडणुकांच्या तोंडावर राज्यात वारंवार अशा प्रकारे रोडक सापडत असल्याने एकच खळबळ माजली आहे.