Chandrapur Namrata Acharya – Themaskar Join BJP: काँग्रेसच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य -ठेमस्कर या किशोर जोरगेवार यांच्यासोबत भाजपात प्रवेश घेणार आहेत.
काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर आणि विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद काही नवा नाही. हा वाद मिटल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जाहीर केलं असलं तरी धुसफुस सुरूच आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विजय वडेट्टीवारांच्या ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात कुणबी समाजाच्या मेळाव्यात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याची चांगलीच चर्चा झाली होती. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाज आपल्यावर राज्य करत आहे. त्यामुळे आता परिवर्तनाची गरज आहे, असं त्या म्हणाल्या होत्या. या बाबत धानोरकर यांच्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली होती.
तसेच, त्यांना दिल्लीत देखील बोलावण्यात आले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे अल्पसंख्याक समाज नाराज आहे. याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसणार अशी शक्यता वर्तवली जात असतानाच काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य -ठेमस्कर यांनी खासदार धानोरकर यांच्यावर जातीवादाचा आरोप करीत पदाचा राजीनामा दिला.
Chandrapur News: प्रतिभा धानोरकरांवर नाराजी, महिला जिल्हाध्यक्षांनी काँग्रेसची साथ सोडली, जोरगेवारांसोबत भाजपात प्रवेश
खासदार धानोरकर यांची विचारशैली काँग्रेस विचारधारेला मारक ठरणारी आहे अशा चर्चा सुरु असताना या चर्चेला ठेमस्कर यांनी केलेला आरोप खतपाणी देणारा ठरला. ठेमस्कर यांच्या जाण्याने त्यापेक्षा त्यांनी केलेल्या आरोपाने काँग्रेसचे नक्कीच काही प्रमाणात नुकसान झाले आहे. आज त्या मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश घेणार आहेत. याचा भाजपाला किती लाभ होणार हे येत्या दिवसात चित्र स्पष्ट होणार आहे.