दिग्गजांच्या विरोधात दंड थोपटले; धुळे ग्रामीणमधून ‘राम’ यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ

Dhule Ram Bhadane BJP Canditure: विधानसभेच्या धुळे ग्रामीण मतदारसंघातून भाजपतर्फे कोणाला उमेदवारी जाहीर होते, याकडे संपूर्ण जिल्ह्यासह खान्देशाचं लक्ष लागलं होते. भाजपने पहिल्या यादीत धुळे ग्रामीणसाठी कोणाचेही नाव जाहीर केलेले नव्हते.

हायलाइट्स:

  • धुळे ग्रामीण मतदारसंघातून भाजपला तिकीट
  • राम भदाणे यांना उमेदवारी जाहीर
  • राज्यातील ठरले सर्वाधिक तरुण उमेदवार..
Lipi
राम भदाणे उमेदवारी जाहीर

अजय गर्दे, धुळे : धुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आज जाहीर केलेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत विधानसभेच्या धुळे ग्रामीण मतदारसंघातून पहिल्याच क्रमांकावर तालुक्याचे युवा नेतृत्व राम तथा राघवेंद्र मनोहर भदाणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भदाणे यांची उमेदवारी जाहीर होताच नगाव (ता. धुळे) येथील गंगामाई एज्युकेशन संस्थेच्या आवारात समर्थक, विविध गावांतील ग्रामस्थ, भाजप महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी समर्थकांनी डीजेच्या तालावर नृत्याचा फेर धरत, फटाक्यांची आतषबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी ”रामदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, जय श्रीराम” आदी घोषणा देत एकच जल्लोष केला. विधानसभेच्या धुळे ग्रामीण मतदारसंघातून भाजपतर्फे कोणाला उमेदवारी जाहीर होते, याकडे संपूर्ण जिल्ह्यासह खान्देशाचं लक्ष लागलं होते. भाजपने पहिल्या यादीत धुळे ग्रामीणसाठी कोणाचेही नाव जाहीर केलेले नव्हते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघ्या दोन-तीन दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने ही उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अखेर भाजपने काल सायंकाळी सहाच्या सुमारास जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत पहिल्याच क्रमांकावर धुळे ग्रामीणमधून भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य तथा पक्षाचे धुळे ग्रामीण विधानसभा प्रमुख राम भदाणे यांची उमेदवारी जाहीर केली. अवघ्या ३२ व्या वर्षी आमदारपदासाठी उमेदवारी मिळवून भदाणे यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
Vasant Deshmukh: जयश्री थोरातांबाबत खालच्या पातळीची भाषा, नगरमध्ये संताप, वसंत देशमुख पोलिसांच्या ताब्यात

यापूर्वी त्यांचे दिवंगत आजोबा तथा जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार द. वा. पाटील यांनी सलग तीन ते चार वेळा आमदारपद भूषविले होते. तसेच राम भदाणे यांचे वडील मनोहर भदाणे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, त्यांच्या मातोश्री ज्ञानज्योतीताई भदाणे यांनी धुळे पंचायत समितीचे सभापतिपद तसेच नगाव ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंचपद सांभाळले आहे. यामुळे कुटुंबातच समृद्ध राजकीय वारसा लाभलेल्या राम भदाणे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला.राम यांचे नाव जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी नगाव येथील गंगामाई एज्युकेशन संस्थेच्या आवारात डीजेच्या तालावर नृत्य करत, फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. यावेळी राम भदाणे यांच्या समर्थनार्थ विविध घोषणाही देण्यात आल्या.

यावेळी तालुक्यातील विविध गावांतील ग्रामस्थ, भाजप महायुतीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. एकमेकांना पेढे भरवत राम भदाणे यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प सर्व उपस्थितांनी केला.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Dhule breaking newsdhule rural ram bhadane candidacy announcedmaharashtra vidhan sabha nivadnuk 2024ram bhadaneधुळे ग्रामीण राम भदाणे उमेदवारी जाहीरधुळे ब्रेकिंग बातम्यामहाराष्ट्र विधानसभा निवडणूकराम भदाणे
Comments (0)
Add Comment