NCP Candidate List: विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ९ नावांचा समावेश आहे. शरद पवार पक्षानं आतापर्यंत ७६ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.
लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का दिला. अजित पवार गटात गेलेल्या बजरंग सोनावणे यांची घरवापसी घडवून आणत पवारांनी त्यांना तिकीट दिलं. मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना पवारांनी सोनावणे यांच्या रुपात मराठा उमेदवार दिला. अटीतटीच्या लढतीत सोनावणेंनी मुंडे यांचा पराभव केला. आता पवारांनी पंकजा मुंडे यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देत लोकसभा पॅटर्न रिपीट केलेला आहे.
चिंचवडमधून शरद पवारांनी राहुल कलाटे यांना तिकीट दिलेलं आहे. २०१९ मध्ये कलाटे यांनी चिंचडवडमधून अपक्ष उमेदवारी केली होती. तेव्हा त्यांनी १ लाख १२ हजार २२५ मतं घेतली होती. पण त्यांचा पराभव झाला. भाजपचे लक्ष्मण जगताप निवडून आले. २०२३ मध्ये चिंचवडमध्ये पोटनिवडणूक झाली. त्यात भाजपनं लक्ष्मण जगताप यांची पत्नी अश्विनी जगताप यांना संधी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसनं विठ्ठल काटेंना तिकीट दिलं. जगताप ३६ हजार १६८ मतांनी विजयी झाल्या. त्यावेळीही राहुल कलाटे अपक्ष लढले. त्यांनी ४४ हजार ११२ मतं घेतली. ठाकरेसेनेत असलेल्या कलाटेंनी बंडखोरी केल्यानं जगताप विजयी झाल्या. आता तेच कलाटे शरद पवारांच्या पक्षाकडून विधानसभा लढणार आहेत.
NCP SP Candidate List: शरद पवारांच्या पक्षाची तिसरी उमेदवार यादी जाहीर; ९ जणांचा समावेश; मुंडेंविरोधात उमेदवार ठरला
शरद पवारांकडून कोणाला कुठून उमेदवारी?
कारंजा-ज्ञायक पटणी
चिंचवड- राहुल कलाटे
माजलगाव- मोहन जगताप
परळी- राजेसाहेब देशमुख
हिंगणा- रमेश बंब
भोसरी -अजित गव्हाणे
अणुशक्तीनगर- फहद अहमद
मोहोळ- सिद्धी रमेश कदम
हिंगणघाट- अतुल वांदिले