Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून मावळमध्ये सुनील शेळकेंना उमेदवारी देण्यात आली आहेत. पण बंडखोरीमुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
महायुतीचे उमेदवार सुनील शेळके आणि भाजपचे बाळा भेगडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांनी भेगडे यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले. पण त्यात त्यांना यश आलं नाही. त्यामुळे बाळा भेगडे अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांचा प्रचार करणार आहेत. बापू भेगडे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यावेळी बाळा भेगडे त्यांच्यासोबत हजर राहणार आहेत. त्यामुळे शेळके यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
अजित पवारांच्या गटातील आमदार सुनील शेळकेंना घेरण्यासाठी शरद पवारांनी वेगळाच डाव टाकला आहे. वास्तविक मावळची जागा महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली आहे. पण इथे उमेदवार न देता पवारांनी बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे मावळमध्ये लक्षवेधी परिस्थिती निर्माण झाली आहे.
महायुतीकडून सुनील शेळकेंची उमेदवारी जाहीर होताच त्याचे पडसाद भाजपमध्ये उमटले. बापू भेगडेंनी बंडखोरी केली. त्यांना बाळा भेगडेंनी पाठिंबा दर्शवली. भेगडेंनी शरद पवारांकडा पाठिंबा मागितला. शेळकेंना कात्रीत पकडण्यासाठी शरद पवारांनीदेखील डाव टाकला. विशेष म्हणजे बापू भेगडे उद्या उमेदवारी अर्ज भरताना शरद पवारही हजर राहणार आहेत.
Maharashtra Election 2024: वाह क्या सीन है! भाजपचे बंडखोर, शरद पवार गट अपक्षाचा प्रचार करणार; दादांचा शिलेदार कोंडीत
बाळा भेगडे २००९ ते २०१९ या कालावधीत मावळचे आमदार राहिले आहेत. ते भाजपचे नेते आहेत. २०१९ मध्ये सुनील शेळकेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढत भेगडेंचा तब्बल ९४ हजार मतांनी धुव्वा उडवला. शेळके अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात.