Shiv Sena Candidate List: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये २० जणांच्या नावांचा समावेश आहे.
शिंदेसेनेने निलेश राणेंना कुडाळमधून, मुरजी पटेल यांना अंधेरी पूर्व, संतोष शेट्टी यांना भिवंडी पूर्वमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे. हे तिन्ही अवघ्या काही दिवसांपूर्वी भाजपमधून शिंदेसेनेत आलेले आहेत. महायुतीत तिन्ही जागा शिंदेसेनेला सुटल्यानं तिन्ही नेत्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामुळे वाटीतलं ताटात असा प्रकार घडला आहे.
लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या, तिकीट कापण्यात आलेल्या नेत्यांनादेखील दुसऱ्या यादीत स्थान देण्यात आलेलं आहे. यवतमाळ-वाशीमच्या माजी खासदार भावना गवळी, हिंगोलीतून लोकसभेला पराभूत झालेल्या बाबुराव कदम कोहळीकर, पालघरचे माजी खासदार राजेंद्र गावित, उत्तर मुंबईचे माजी खासदार संजय निरुपम यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. गवळी रिसोडमधून, कोहळीकर हदगावमधून, गावित पालघरमधून, तर निरुपम दिंडोशीतून विधानसभा लढणार आहेत.
कोणाला कुठून उमेदवारी-
अक्कलकुवा- आमश्या पाडवी
बाळापूर- बळीराम शिरसकर
रिसोड- भावना गवळी
हदगाव- बाबुराव कोहळीकर
नांदेड दक्षिण- आनंद तिडके पाटील
परभणी- आनंद भरोसे
पालघर- राजेंद्र गावित
बोईसर- विलास तरे
भिवंडी ग्रामीण- शांताराम मोरे
भिवंडी पूर्व- संतोष शेट्टी
कल्याण पश्चिम- विश्वनाथ भोईर
अंबरनाथ- बालाजी किणीकर
विक्रोळी- सुवर्णा करंजे
दिंडोशी- संजय निरुपम
अंधेरी पूर्व- मुरजी पटेल
चेंबूर- तुकारामा काते
वरळी- मिलिंद देवरा
पुरंदर- विजय शिवतारे
कुडाळ- निलेश राणे
कोल्हापूर- राजेश क्षीरसागर