अहिल्यानगरमध्ये ठाकरे गट बंडखोरीच्या तयारीत, उद्या घेणार मोठा निर्णय, काँग्रेस अलिप्त?

Ahmednagar Vidhan Sabha: महाविकास आघाडीच्या जागावाटपात अहिल्यानगर (अहमदनगर) शहर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे गेली. त्यांच्याकडून माजी महापौर अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, यासाठी जोरदार दावा केलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी नाराजी पसरली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अहिल्यानगर : महाविकास आघाडीच्या जागावाटपात अहिल्यानगर (अहमदनगर) शहर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे गेली. त्यांच्याकडून माजी महापौर अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, यासाठी जोरदार दावा केलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी नाराजी पसरली आहे. काही पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे देण्याची तयारी बोलून दाखविली. त्यामुळे रविवारी सायंकाळी पक्षाची तातडीची बैठक झाली. त्यामध्ये राजीनामे न देता स्वतंत्रपणे लढण्यावर चर्चा झाली. त्यानुसार उद्या दुपारी १ वाजता पुन्हा अंतिम बैठक घेऊन उमेदवार आणि पुढील भूमिका ठरविण्यात येणार आहे. तर याच जागेवर दावा असलेल्या काँग्रेसमध्येही नाराजी आहे. त्यामुळे शहरातील काही पदाधिकाऱ्यांनी संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूर येथील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात जाण्याचे ठरविले आहे. इतरांन मात्र पक्षाचा निर्णय मान्य करण्याचे ठरविले असल्याचे सांगण्यात आले.

शहर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माजी महापौर अभिषेक कळमकर यांना उमेदवारी दिली आहे. पवार यांचे जुने खंदे समर्थक दादा कळमकर यांचे अभिषेक पुतणे आहेत. त्यांची लढत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सलग दोन वेळा आमदार असलेले संग्राम जगताप यांच्याशी होणार आहे. पक्षाला जागा न मिळाल्याने शिवसैनिक नाराज झाले. रविवारी सायंकाळी झालेल्या बैठकील जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, विक्रम राठोड, संभाजी कदम यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेचा उमेदवारच नसल्याने शहरातील पक्षाचे अस्तित्व धोक्यात आल्याचे मत यावेळी मांडण्यात आले.

शिवसेनेचे नगर शहरातील अस्तित्व १९८९ पासून आहे. माजी आमदार अनिल राठोड यांनी पंचवीस वर्षे प्रतिनिधीत्व करून पक्ष वाढविला. आता पहिल्यांदाच गेल्या ३५ वर्षांमध्ये पक्षाला उमेदवारी मिळाली नाही. या निर्णयामुळे नगर शहरातील शिवसैनिक, कार्यकर्ते, नागरिक आणि साधा नगरकर अस्वस्थ झालेले आहेत, अशा भावना यावेळी व्यक्त झाल्या.शिवसैनिकांच्या भावना लक्षात घेऊन उद्या २८ ऑक्टोबरला पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय झाला. राजीनामे देण्याऐवजी लढावे, असा निर्णय झाला. सर्व इच्छुकांनी २९ ऑक्टोबरला अर्ज दाखल करायचे, त्यानंतर पक्ष सांगेल त्याप्रमाणे निर्णय घ्यायचा, असे यावेळी ठरविण्यात आले. आता उद्याच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. जर पक्षाच्या आदेशानुसार बंड थंड झाले तर गेल्या ३५ वर्षांत नगरमध्ये प्रथमच शिवसेनेशिवाय निवडणूक होणार आहे.

गेल्या दोन निवडणुकांत शिवसेनेला पराभव स्वीकारावा लागला होता. तर आता शिवसेना रिंगणातही नसण्याची नामुष्की येऊन ठेपली आहे.
यात आणखी एक योगायोग असा आहे की, माजी आमदार दादा कळमकर राष्ट्रवादी एकत्र असताना शिवसेनेच्या अनिल राठोड यांच्याकडून चार वेळा पराभूत झाले होते. त्यानंतर दहा वर्षांपूर्वी राठोड यांचा सलग दोनदा पराभव करून संग्राम जगताप विजयी झाले. आता कळमकर यांचे पुतणे जगताप यांच्या विरूद्ध रिंगणात उतरले आहेत. या दृष्टीनेही ही निवडणूक रंगतदार होणार आहे.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

ahmednagar vidhan sabhachallenges for abhishek kalamkarmh vidhan sabha nivadnukncp sharad pawarshivsena ubt in ahmednagarअभिषेक कळमकरांसमोर आव्हानअहमदनगर विधानसभेतील राजकारणनगरमधील शिवसेनेत बंडखोरीमहाराष्ट्र विधानसभेचे रणशरद पवारांची राष्ट्रवादी
Comments (0)
Add Comment