Pune Chinchwad Nana Kate Contest Independent : पुण्यात अजित पवारांच्या शिलेदाराने बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं आहे. उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष लढण्याचं म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती असलेले नाना काटे हे चिंचवड विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते. मात्र महायुतीने या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर नाना काटे यांनी आपल्याला महाविकास आघाडीचा पर्याय खुला असल्याचंही म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांशी वारंवार त्यांच्या बैठका झाल्या होत्या. मात्र या सर्व बैठका फोल ठरल्या.
अखेर आज महाविकास आघाडीने चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राहुल कलाटे यांना उमेदवारी जाहीर केली आणि नाना काटे यांच्या पुढे मोठा पेच निर्माण झाला.
त्यामुळे नाराज झालेल्या नाना काटे यांनी आपण काही झालं तरी निवडणूक लढवण्यावर ठाम असून उद्याच आपण जोरदार शक्ती प्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये पोट निवडणुकीच्या वेळी ज्याप्रमाणे तिरंगी लढत झाली होती. त्याचाच प्रत्यय आता या विधानसभा निवडणुकीला येणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.
Pune News : पुण्यात या मतदारसंघात अजित पवारांना धक्का, पक्षात पहिली बंडखोरी; ‘तो’ नेता अपक्ष लढणार
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये नाना काटे हे अजित पवारांनासोबत गेले होते. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर वारं फिरलं आणि शरद पवारांकडे जुने नेते घरवापसी करण्यात सुरुवात झाली. मात्र विधानसभा निवडणूक लागल्यानंतर नाना काटे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र महायुतीकडून ही जागा भाजपला सुटल्याने त्यांनी महाविकास आघाडीकडे निवडणूक लढण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती. मात्र महाविकास आघाडीकडूनदेखील नाना काटे यांना ही जागा सुटल्याने ते अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारी करत असल्याचं त्यांनी सांगितले.