Baramati Yugendra Pawar vs Ajit Pawar: बारामतीतून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणाऱ्या युगेंद्र पवार यांचा सोमवारी तारखेला दाखल केला जाणार आहे. राष्ट्रवादी शरद पवाराचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः यावेळी उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे महायुतीचे उमेदवार व उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही सोमवारीच अर्ज दाखल करणार आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार व अजित पवार हे दोघेही रविवारीच बारामतीत दाखल झाले आहेत. अजित पवार यांनी रविवारी राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत निवडणूक रणनीती आखली आहे. तर दुसरीकडे शरद पवार हे ही बारामतीत दाखल झाले आहेत.
सोमवारी सकाळी साडेदहा वाजता शरद पवार यांच्या उपस्थितीत युगेंद्र पवार हे अर्ज दाखल करणार आहेत. युगेंद्र पवार हे कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता साधेपणाने अर्ज दाखल करणार आहेत. येत्या दोन दिवसांत दिग्गजांच्या उपस्थितीत युगेंद्र पवारांच्या प्रचाराची सुरुवात कन्हेरीतून होणार आहे. दुसरीकडे अजित पवार हे अर्ज दाखल करण्यापूर्वी बारामतीत शक्ती प्रदर्शन करणार आहेत. सकाळी १० वाजता कसब्यातून त्यांची मिरवणूक सुरु होणार आहे. त्यासाठी शहरासह तालुक्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी-कार्यकर्ते बारामतीत दाखल होणार आहेत. शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूकीने ते प्रशासकीय भवनात जात अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजता कन्हेरीतून ते प्रचाराची सुरुवात करणार आहेत.