मावळात महायुतीच्या वादावर पडदा? दादांच्या शिलेदारासाठी देवेंद्र फडणवीसांच्या स्वपक्षीय नेत्याला सूचना

Edited byविमल पाटील | Authored by प्रशांत श्रीमंदिलकर | Lipi | Updated: 28 Oct 2024, 12:29 am

Maval Vidhan Sabha Politics: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. यातच महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील शेळके यांच्याविरोधात मावळमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दंड थोपटत राजीनामे दिले होते. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मावळमध्ये सुनील शेळकेंसमोरील एक आव्हान संपुष्टात आल्याचे समजते.

Lipi

मुंबई/पुणे : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. यातच महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील शेळके यांच्याविरोधात मावळमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दंड थोपटत राजीनामे दिले होते. सुनील शेळके यांचे काम करणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मावळमध्ये सुनील शेळकेंसमोरील एक आव्हान संपुष्टात आल्याचे समजते. स्वतः आमदार सुनील शेळके यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.

सुनील शेळके यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे नेते बाळा भेगडे यांच्यासह अन्य नेत्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मावाळमध्ये मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. संपूर्ण राज्यात याची चर्चा रंगली होती. यातच मावळचे दोन टर्म आमदार राहिलेल्या बाळा भेगडेंनी अपक्ष उमेदवार बापू भेगडेंचा प्रचार करण्याची भूमिका जाहीर केली होती. मात्र फडणवीसांच्या मध्यथीने या वादावर पडदा पडल्याची माहिती आहे.

महायुतीतील हा वाद सोडवण्यासाठी सुनील शेळकेंसह बाळा भेगडे यांनी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यात जर महायुतीचे सरकार आणायचे असेल तर मतभेद बाजूला ठेवून महायुतीच्या उमेदवाराचे काम केले पाहिजे, असे सांगत बाळा भेगडे यांची मनधरणी करण्याज फडणवीसांना यश आले आहे. भेगडेंची नाराजी दूर झाल्यास सुनील शेळके यांच्या पाठी भाजपसह शिवसेना शिंदे गटाची मोठी ताकद उभी राहू शकते.

यासंदर्भात सुनील शेळके म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मला आणि माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे या दोघांना या ठिकाणी बोलवून घेतले होते. आम्हा दोघांनाही एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. उद्याच्या काळात महायुतीचे सरकार या राज्यामध्ये आणायचं असेल तर आपण एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज आहे. आपल्याला पुण्यातील अनेक जागा या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताकदीवर निवडून आणायच्या आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम केले पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सूचना केल्यात. आमच्यात सकारात्मक चर्चा झाली असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शेळके यांनी सांगितले.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

BJP in Maval Punebjp leader bala bhegdeDevendra FadnavisMaval Vidhan Sabhasunil shelkeअजित पवारांची राष्ट्रवादीदेवेंद्र फडणवीस मॅजिकभाजपचे बाळा भेगडेंची भूमिकामावळ विधानसभेतील राजकारणसुनील शेळकेंसमोरील आव्हान
Comments (0)
Add Comment