Radhakrishna Vikhe Patil on Jayashree Thorat: वसंत देशमुखांच्या बेताल वक्तव्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील विखे आणि थोरात कुटुंबात वादाची ठिणगी पडली आहे. यातच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जयश्री थोरात यांना प्रतिसवाल केला आहे.
‘सुजय विखेंच्या सभेत जे वक्तव्य केलं गेलं त्याबद्दल आम्ही आधीच स्पष्टीकरण दिलं आहे. वसंतराव देशमुखांनी वापरललेल्या अपशब्दांचा आम्ही निषेध केला आहे.’ असे नमूद करत राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले, माझ्या आणि सुजयच्या सार्वजनिक जीवनात आम्ही कधीही अशी वक्तव्य केलेले नाही . देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी अटक करावी हीच मागणी आम्ही केली होती. मात्र वसंत देशमुख हे भाजपचे नाही तर काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, काँग्रेसनेच आता त्यांच्यावर कारवाई करावी, असे विखे पाटील यांनी म्हटले.
जयश्री थोरातांना प्रतिसवाल करत विखे पाटील म्हणाले की, ‘ आम्ही जयश्री ताईबद्दल आम्ही काहीच बोललो नाही. मग त्या स्वतःला या प्रकरणात का ओढवून घेत आहेत? वसंत देशमुख हे तेथील कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. म्हणजे ते आमचे होत नाहीत. तर मागे सुजय विखेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता, त्याची माफी कोण मागणार?’ यासोबतच विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरांतावर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले, जयश्रीताई तुम्ही या भानगडीत पडू नका. यावेळी तुमच्या पिताश्रींचा दहशतवाद समोर आला आहे.
दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील जाळपोळीच्या घटनेवर पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले, ‘वसंतराव देशमुख बोलले यामागे राजकीय षडयंत्राचा भाग वाटत आहे. संगमनेर तालुक्यात सुजयची लोकप्रियता वाढली आहे, त्यांच्या बालेकिल्ल्यात सुजयच्या उच्चांकी सभा होत आहेत. त्यामुळे, थोरातांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. फक्त अर्ध्या तासात थोरातांचे गुंड गोळा झाले. थोरातांचा पीए, त्यांचे भाऊ इंद्रजीत थोरात यांच्या गाडीत काठ्या कुऱ्हाडी होत्या, त्यांना सुजयवरच प्राणघातक हल्ला करायचा होता.’
तसेच ‘इतके वर्ष थोरात यांनी दहशत माजवून निवडणुका जिंकल्या, एकीकडे स्वतःला सुसंस्कृत म्हणता आणि दुसरीकडे राजकीय दहशतवाद सुरू आहे. गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ सुनियोजित होती. महिला आणि कार्यकर्त्यांना मारहाण झाली, याची चौकशी व्हायलाच पाहिजे, याचा मास्टरमाईंड कोण याचा शोध घ्यावा लागेल, अशा शब्दांना राधाकृष्ण विखे पाटलांनी बाळासाहेब थोरातांवर निशाणा साधला आहे.