पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जागावाटप निश्चित केले असून अजित गव्हाणे भोसरीतून तर राहुल कलाटे चिंचवडमधून निवडणूक लढवत आहेत. दोन्ही मतदारसंघात तीव्र स्पर्धा पाहायला मिळणार असून, भोसरीत भाजपचे महेश लांडगे आणि चिंचवडमध्ये शंकर जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादीने तगडे उमेदवार उभे केले आहेत.
पहिली मतदार यादी जाहीर झाल्यानंतर महेश लांडगे यांना भोसरी साठी आणि शंकर जगताप यांना चिंचवडसाठी उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यानंतर महाविकास आघाडी कडून जागावाटप निश्चित होत नव्हते. मात्र आता चिंचवड आणि भोसरीचे जागावाटप निश्चित झाले असून या दोन्ही मतदारसंघांमध्ये अटीतटीची लढाई बघायला मिळणार आहे. राहुल कलाटे यांनी मागच्या पोटनिवडणुकीमध्ये चांगले मताधिक्य घेतले होते. त्यामुळे नाना काटे यांना परावाचा सामना करावा लागला होता, अशी चर्चा त्यावेळी झाली होती.
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व महेश लांडगे करत असून त्यांना माझ्याकडून पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. अजित गव्हाणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षाकडून उमेदवार असून या मतदारसंघात देखील मोठी टॉप फाइट बघायला मिळणार आहे. अजित गव्हाणे यांना उमेदवारी दिल्यामुळे भोसरीमध्ये महाविकास आघाडीने भाजप समोर तगडे आव्हान उभे केले असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
गेल्या दहा वर्षापासून महेश लांडगे भोसरी या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. तसेच अजित गव्हाणे यांचे देखील या मतदारसंघावर चांगली पकड आहे. त्यामुळे महेश लांडगे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षाकडून चांगला उमेदवार देण्याची चर्चा सुरू झाली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये शंकर जगताप हे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे भाऊ आहेत. तसेच राहुल कलाटे यांचे देखील या मतदारसंघावर चांगली पकड आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या दोन्ही मतदारसंघात चुरस पाहायला मिळणार आहे.