Mumbai Mahim Vidhan Sabha Constituency: ”कमळा बाई, तेरा ये जलवा, माहिमचा हलवा, जिवाचा कालवा, मनाला भूलवा, आशिषला बोलवा, सदाला भूलवा, कालवा-हलवा, कालवा-हलवा, कळलं का माय? असं म्हणत त्यांनी हे गाणं सध्या मार्केटमध्ये ट्रेडिंगला आहे म्हणे..?, अशी त्यांनी ट्वीटवर (एक्स) पोस्ट टाकली आहे.
हायलाइट्स:
- कमळा बाई, तेरा ये जलवा, माहिमचा हलवा
- जिवाचा कालवा, मनाला भूलवा
- आशिषला बोलवा, सदाला भूलवा
सुषमा अंधारे यांची पोस्ट?
”कमळा बाई, तेरा ये जलवा, माहिमचा हलवा, जिवाचा कालवा, मनाला भूलवा, आशिषला बोलवा, सदाला भूलवा, कालवा-हलवा, कालवा-हलवा, कळलं का माय? असं म्हणत त्यांनी हे गाणं सध्या मार्केटमध्ये ट्रेडिंगला आहे म्हणे..?, अशी त्यांनी ट्वीटवर (एक्स) पोस्ट टाकली आहे.
माहीममध्ये अमित ठाकरेंसाठी महायुती आणि मनसे यांच्याकडून लॉबिंग सुरू असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. अमित ठाकरेंचा रस्ता सोपा होण्यासाठी विद्यमान आमदार सदा सरवणकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं बोललं जात आहे. माहीममधून अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यात लढत होणार आहे. पण, असं झाल्यास खरा फायदा ठाकरे गटाच्या उमेदवाराला होऊ शकतो, असं बोललं जात आहे. त्यामुळे अमित ठाकरेंचं विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातलं आव्हान कमी करण्यासाठी महायुती आणि मनसेकडून प्रयत्नांची पराकाष्टा सुरू असल्याचं दिसत आहे.
आशिष शेलार यांनी अमित ठाकरेंना महायुतीनं समर्थन दिले पाहिजे, असं वक्तव्य करत सस्पेन्स आणखी वाढवला. सदा सरवणकरांना विरोध नाही पण महायुती म्हणून आपल्याच घरचा मुलगा निवडून आणू, असं आशिष शेलार म्हणाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बोलताना शिंदेंचे आमदार आणि मंत्री दीपक केसरकर यांनी देखील अमित ठाकरेंच्या बाजूने वक्तव्य केलं. त्यामुळे आता सरवणकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं बोललं जात आहे.